आरंभहा तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी बनविण्यात आलेला एक पॅन-इंडिया पीसी आहे. याची निर्मिती पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजिटल इंडिया मध्ये भक्कम पाया मिळवून देण्यासाठी केली गेली आहे. याचे उद्दिष्ट पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे हे आहे जेणेकरून ते पीसी चा वापर करून शाळेत तसेच घरी अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतील.

डेल मध्ये आम्ही जेव्हा सद्य परिस्थितीचा अभ्यास केला तेव्हा आमच्या असे लक्षात आले की भारतात पीसी चा वापर हा केवळ 10%. इतकाच आहे. जेव्हा आम्ही ही पाहाणी केली तेव्हा असे आढळून आले की पालक आणि शिक्षक दोघांनाही शिक्षणासाठी पीसी चे महत्व समजून आल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष वापराची वेळ येते तेव्हा त्यांना अज्ञानामुळे रस्ता बंद झाल्यासारखे वाटते - कारण पीसी चा शिक्षणासाठी वापर कसा करावा याची कोणालाच नीटशी कल्पना नसते.

आमची अशी खात्री आहे की पालक, विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांना योग्य प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास ही परिस्थिती सहजपणे हाताळली जाऊ शकते. आम्ही पालक तसेच शिक्षक आणि पर्यायाने विद्यार्थी यांना पीसी च्या वापरातील महत्वाची कौशल्ये शिकवून कंप्यूटर द्वारे मिळणारे ज्ञान त्यांना सहज उपलब्ध करून देतो.

कल्पनाशक्ती, सखोल विचार करण्याची क्षमता आणि जटील प्रश्न सोडविणे ही आजच्या डिजिटल भारतातील भारतीयांसाठी आवश्यक अशी तीन प्रमुख कौशल्ये आहेत आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ही तीन कौशल्ये मिळवून देण्याचा आरंभ हाआमचा प्रयत्न आहे. आमच्या डेल चॅम्प्स स्कूल काँटॅक्ट कार्यक्रमाद्वारे आम्ही जवळपास 1.5 दशलक्ष विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे. NIIT च्या सहकार्याने आम्ही 70 शहरांमधील 5000 पेक्षा जास्त शाळांमधील 1,25,000 शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट बाळगून आहोत. तसेच डेल डिजी मॉम कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 4,00,000 मातांना सक्षम बनविण्याच्या प्रयत्नात आहोत.

चला, आमच्या या प्रयत्नात आमची साथ द्या - शिक्षणाच्या नविन मार्गाचा 'आरंभ' करूया.