बालवाडी पालकांसाठी टिप्स

तुम्ही शाळा-पूर्व मुलाचे पालक असाल तर, काही वेळा आपल्या मुलामागे धावपळ करणं तुम्हाला आव्हानात्मक आणि कंटाळवाणं वाटण्याची शक्यता आहे. मुलांना वाढवणं हे सर्वात कठीण कामांपैकी एक आहे, पण तुम्हाला ते एकट्यानं करण्याची गरज नाही.

तुमचं मूल आणि त्याची शाळा यांच्या संबंधात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपली त्यांच्यातली गुंतवणूक वाढवण्याचे काही साधे मार्ग आहेत. तुमच्या मुलाच्या शिक्षणात सहभागी होण्याचे अनेक फायदे आहेत. पालकांचा शिक्षणातला सहभाग शाळांना प्रोत्साहन देतो आणि तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळतं हे मुलाच्याही लक्षात येतं. इथे आम्ही पालकत्वासंबंधी काही टिप्स देत आहोत त्यांची तुम्हाला तुमच्या मुलाला वाढवण्यात नक्कीच मदत होईल.  

घरातून पुढाकार घ्या-

सादरीकरण किंवा तत्सम धड्यांसाठी सामग्री तयार करायला मदत करा. तुम्ही पीटीएमध्येही सहभागी होऊ शकता. घरात तुम्ही असा स्वतःहून पुढाकार  घेतला, तर त्यातून तुमच्या मुलाला शाळा महत्वाची आहे, हे लक्षात येईल. त्यातून तुमचे शिक्षकांशी असलेले संबंधही दृढ व्हायला मदत होईल.

शाळेच्या कार्यक्रमांना उपस्थित रहा-

व्हर्च्युअल ओपन हाऊस, आर्ट शो आणि शाळेच्या इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं ठरवून टाका. स्टाफ मेंबर आणि इतर पालकांशी संवाद साधण्यासाठी शालेय कार्यक्रम हे एक उत्तम माध्यम आहे.

तुमच्या मुलाशी शाळेविषयी बोला-

"आज तुमच्या वर्गात काय झालं?" असं म्हणण्याऐवजी, "आज वर्गात घडणारी सर्वात चांगली गोष्ट कोणती घडली?" आणि "आज तुम्ही बालवाडीमध्ये शिकलेल्या नवीन गोष्टी सांगा." असे प्रश्न विचारा.

तंत्रज्ञानाच्या युगात मुलांचं संगोपन करणं अवघड झालेलं आहे. जेव्हा पालकांना योग्य तांत्रिक ज्ञान असतं, तेव्हा ही सर्व कामं अधिक प्रभावीपणे करता येतात. काही वेळा तुमच्या मुलाची उर्जा पातळी आणि कुतूहल टिकवून ठेवणं तुम्हाला अवघड वाटेल. तुम्हाला तुमची पालकत्व शैली विकसित करण्यासाठी मदतीची आवश्यकता भासली, तर या पालकत्वाच्या टिप्सची मदत घ्या.

21 शतकातल्या डिजिटल रहिवाश्यांचं पालकत्व या विषयावर आमच्या वेबिनारमध्ये इथे सहभागी व्हा- https://www.dellaarambh.com/webinars/