संकरित शिक्षणासाठी महत्वाच्या टिप्स

आधुनिक शिक्षण तंत्रज्ञानाने संकरित शिक्षणासाठी वातावरण तयार करणं सुलभ झालेलं आहे. संकरित शिक्षणात शिक्षक एकाच वेळी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन  विद्यार्थ्यांना शिकवू शकतात.

हे एक असं मॉडेल आहे ज्याचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे. या दृष्टीकोनाच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे आणि येत्या महिन्यांत आणि वर्षांमध्ये त्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच, संकरित शिक्षणाच्या टिप्स समजून घेण्याचा प्रयत्न करणं महत्वाचं आहे.

दोन्ही गटांकडे समान लक्ष द्या.

ज्या वर्गात विद्यार्थी तुमच्यासह प्रत्यक्ष उपस्थित आहेत अशा वर्गात शिकवताना प्रत्यक्ष समोर असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याकडे शिक्षकांचा कल असतो. त्यामुळे अशा सापळ्यात न अडकता दोन्ही गटांकडे समान लक्ष द्या.

दोन्ही गट एकत्रित काम करतील याची खात्री करा

तुमच्या ऑफलाइन आणि ऑनलाइन विद्यार्थ्यांना एकमेकांशी संवाद साधण्याची संधी द्या. त्यांनी एकत्रित उपक्रम आणि प्रकल्पांमध्ये भाग घेतल्याची खात्री करा, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही दरी निर्माण होणार नाही. 

संकरित शिक्षणामुळे आपला शिक्षणाबद्दल विचार करण्याचा दृष्टीकोन बदलतो आहे आणि आधीपासून अस्तित्वात असलेले बरेच अडथळे त्यामुळे दूर होत आहेत. यातून विद्यार्थ्यांना कसं शिकायचं हे निवडण्यासाठी अधिक लवचिकता आणि स्वातंत्र्यच तर मिळतंच, शिवाय शिक्षणाचा प्रसारही वाढू शकतो.

अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या वेबिनारमध्ये सहभागी व्हा-

https://www.dellaarambh.com/webinars/