ई-शिक्षणाचे तीन सर्वोच्च फायदे

प्रशिक्षक आणि वर्गशिक्षकांसाठी ई-शिक्षण हा अमूल्य स्रोत बनला आहे. त्यात विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीनं शिकता येईल अशा ज्ञान प्रसाराच्या नव्या प्रतिमानांचा उपयोग केला जातो.

हा विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन अद्वितीय आहे, कारण आता विद्यार्थी त्यांची शैक्षणिक दिशा सामायिक करतात आणि अध्यापनाचे स्रोत आणि वेळ या दोन्हीमध्ये वाढ होते. त्याचे काही मोठे फायदे असे आहेत.

1. वैयक्तिक गती

शिक्षणाच्या ऑनलाईन पद्धती शिक्षकांना खूप गरजेची असलेली परिणामकारता देतात, त्यामुळे त्यांना वर्गातच वैयक्तिक शिक्षणक्षमतांचा आणि शैलींचा जास्तीत जास्त विकास करण्याची संधी मिळते.

2. भविष्याचा मार्ग

ऑनालाईन शिक्षणामुळे शिक्षकाला वेळेची लवचिकता आणि किफायतशीरपणा मिळतो. त्यातून नव्या शिक्षण-माध्यमांचा वापर करण्याची संधीही मिळते, शिवाय जगभरातल्या सर्वोत्तम शिक्षकांकडून दूरस्थ शिक्षणाद्वारे शिकण्याची संधीही मिळते.

3. प्रशिक्षणाची संधी

चांगल्या शिक्षकांना शिकवायला आवडतं, पण उत्कृष्ट शिक्षक सतत शिकण्याची संधी शोधत असतात. ई -शिक्षण स्रोतांच्या माध्यमातून शिकणं हा आपला शिक्षणविषयक दृष्टीकोन अद्यतन करुन त्याला धार लावण्याचा मार्ग आहे. त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या क्षेत्रात सतत एक पाऊल पुढे रहावं लागतं, परिणामी व्यावसायिक विकास ही दैनंदिन प्रक्रिया बनते.

ऑनलाईन शिक्षण हे फक्त विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या अपेक्षांपलिकडे प्रगती करण्यासाठी सक्षम करत नाही, तर त्यातून त्यांना अभ्यासक्रमापुढे जाऊन शिकण्यासाठी प्रोत्साहनही मिळतं. त्यामुळे शिक्षण अधिक उपयुक्त, आजच्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या समावेशकतेशी सुसंगत आणि आनंदाचं बनतं.

गुंतवणाऱ्या आणि प्रभावी ऑनलाईन शिक्षणावर आमच्या वेबिनारमध्ये सहभागी व्हा-

https://www.dellaarambh.com/webinars/