संगणकामुळे तुमच्या मुलाची जीवनदृष्टी कशी बदलते

 

जग दिवसेंदिवस जवळ येत चाललं आहे. तंत्रज्ञानाच्या आगमन आणि वाढत्या प्रसारामुळे राष्ट्रांच्या सीमा ओलांडून जग हे एक प्रचंड मोठ्या सांस्कृतिक संगमाचं पात्र बनत चाललं आहे.

 

या नव्या जगात संगणकांनी लोकांची जीवनदृष्टी विस्तारण्यात महत्वाची भूमिका निभावलेली आहे. या नव्या जगात प्रवेश करताना तुमच्या मुलांनी आपली जीवनदृष्टी विस्तारण्यासाठी संगणक-आधारित शिक्षणाचे फायदे अनुभवणं  गरजेचं आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने भविष्यासाठी तयार नागरिक बनू शकतील.

 

संगणाक-आधारित शिक्षणामुळे तुमच्या मुलाला घरबसल्या संगणकाच्या मदतीने इतर राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये जाण्याचं साहस करण्याची संधी मिळते. यामुळे त्यांना नव्या संस्कृतींचा शोध घेणं शक्य होतं आणि इतर देशांमधली महत्वाची ठिकाणं, उद्यानं, पर्यटन स्थळं अश्या अनेक गोष्टींची माहिती मिळवता येते.

 

संगणकामुळे मुलांना जगाच्या इतर भागांतले खाद्यपदार्थ, भाषा आणि उत्सव यांच्याविषयी विलक्षण माहिती मिळते, त्यामुळे त्यांची उत्सुकता वाढते. यामुळे मुलांना ज्ञात असलेल्या जगापलीकडे पाहण्याची संधी मिळते आणि त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विस्तारतो.

 

घराजवळ राहून मुलांना ती जिथे प्रत्यक्ष गेलेली नाहीत अशा त्यांच्याच देशातल्या ठिकाणांविषयी माहिती मिळते, त्यामुळे त्यांचा स्वतःच्या देशाविषयीचा दृष्टीकोन विस्तारतो. ग्रामीण भागातल्या मुलांना शहरांविषयी जाणून घेता येतं आणि शहरातल्या मुलांना शेतीबद्दल आणि त्यांना अज्ञात असलेल्या जंगलांबद्दल माहिती मिळते.

 

अश्या परस्परसंवादी शिक्षणप्रक्रिया आणि शोध घेण्यामुळे तुमच्या मुलाचा चौकस, उत्सुक आणि नेहमी ज्ञानासाठी भुकेल्या अश्या जागतिक नागरिकामध्ये विकास व्हायला मदत होईल. तुम्हाला फक्त संगणक शिक्षणाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सुप्तावस्थेत असलेली ठिणगी पेटण्याची गरज आहे. मग बघा त्याची उत्सुकता आणि रुची कशी वाढत जाईल ते.

 

तुम्हाला कळण्याआधीच तुमचं मूल तुम्हाला अश्या देशांविषयी आणि संस्कृतींविषयी माहिती सांगेल, ज्यांची तुम्ही कधी नावंही ऐकली नसतील. या प्रक्रियेत तुमच्या स्वतःच्या जागतिक आणि सांस्कृतिक ज्ञानाचा विस्तार होऊन ते समृद्ध होत जाईल.