तुमच्या मुलाला या अपारंपरिक मार्गांद्वारे शिक्षण द्या

 

केवळ पुस्तकं आणि वर्गातून शिक्षण देण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले. आज तंत्रज्ञानाचा विकास अफाट वेगानं होत असताना, उद्याच्या मुलांना वैशिष्ट्यपूर्ण आणि अपारंपरिक मार्गांनी शिक्षण देणं शक्य आहे.

 

पालक या नात्यानं तुम्ही सर्वोत्तम वर्च्युअल शिक्षणाचा वापर करुन तुमच्या मुलांच्या शिकण्याच्या पद्धतीत क्रांतीकारक बदल घडवून आणू शकता. यामुळे त्यांना शिक्षण अधिक चांगल्या प्रकारे आत्मसात करायला मदत होईल.

 

हे करण्याचे सुलभ मार्ग याप्रमाणे

  • ऑनलाईन उपक्रमात नाव नोंदवा

तुमच्या मुलासह तुम्ही एकत्र शिकायला आवडेल असं एखादं कौशल्य निवडा. ते  गाणं, नृत्य, किंवा संगीत शिक्षण यापैकी काहीही असू शकेल. यामुळे त्यांना नवी कौशल्यं तर शिकायला मिळतीलच, शिवाय त्यांचं तुमच्याशी असलेलं नातंही घट्ट होईल.

 

  • एकत्र स्वयंपाक करणं

हा एक सुंदर एकत्र बांधणारा आणि शिकवणारा अनुभव ठरु शकतो. हे अगदी सोपं आहे. यूट्यूबवर एखादी करायला सोपी असणारी पाककृती लावा आणि ती एकत्र शिका, प्रयोग करा.

 

  • ऑनलाईन गेम्स खेळणं

अनेक मजेशीर आणि एकत्र खेळायचे गेम्स ऑनलाईन उपलब्ध आहेत.स्क्रॅबल सारख्या खेळाची एखादी चटतन खेळलेली फेरी तुमच्या मुलाच्या मेंदूला चालना देऊ शकेल आणि इ-शिक्षणाचा सुंदर मार्ग ठरेल. त्याचवेळी तुम्ही दोघं एकत्र खूप धमाल करु शकाल.

 

  • शैक्षणिक चित्रपट बघा

तुमच्या मुलाचं लक्ष वेधून घेण्याच्या सर्वोत्तम मार्गांपैकी एक म्हणजे दृक्-श्राव्य माध्यम. एखादा रंजक आणि शैक्षणिक चित्रपट लावल्यामुळे तुमचा एकत्र वेळ तर चांगला जाईलच, पण त्या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना काहीतरी शिकवूसुद्धा शकाल.

 

या काही सोप्या सूचनांचा वापर केलात तर तुम्ही तुमच्या मुलाबरोबर शैक्षणिक आणि रंजक अनुभव घेऊन त्यांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तयार करु शकाल.