पालकांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षकाला काय प्रश्न विचारायला हवेत?

आजच्या लक्षविचलक, डीजीटल युगात आपल्या मुलाच्या शैक्षणिक प्रगतीचा माग ठेवणे आव्हानात्मक बनलेले आहे. म्हणूनच पालक या रूपाने, आपण आपल्या मुलांच्या शिक्षकांना त्याशी निगडीत असलेले प्रश्न विचारात रहायला हवेत. उत्तरांमुळे त्याबाबतीतला अंतरंग आपल्यासमोर येईल तसेच पाल्याची प्रगतीचा माग घेणे, कमतरता जाणण्याची मुभा मिळेल तसेच त्यांच्यासाठी शिकण्याचा प्रभावी, परिपूर्ण अनुभव निर्मित करू शकू.

 

यांपैकी काही प्रश्न अशाप्रकारे आहेत:

 

  1. कोणते दृष्टीकोण माझ्या मुलाने अधिकतर प्रगती करण्याप्रति कारणीभूत ठरले?

 

या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आपले पाल्य कोणत्या शिक्षण पध्दतींना अधिकतम प्रत्युत्तर देते हे ओळखण्यात सहाय्य होईल. त्यानंतर आपण त्या पध्दतींना घरीदेखील दुपटीने अंमलात आणू शकता ज्याने शाळेतील शिकवणीची उजळणी होईल.

 

  1. या कालावधीतील माझ्या पाल्याचे सर्वोत्तम यश काय होते?

 

हा प्रश्न महत्वाचा आहे. आपले पाल्य कोणत्या गोष्टीमध्ये खरोखरच रूची घेते हे आपल्याला कळू शकते. एकदा का आपल्याला त्यांची कुवत तसेच हुषारी ज्ञात झाली, की तुम्ही त्यांना प्रभावीरीत्या प्रगत करू शकता.

 

  1. माझे पाल्य मागे पडत असल्यास मी काय करायला हवे?

 

असे झाले असेल तर हताश होऊ नका. आपण आपल्या पाल्याच्या शिक्षकाशी सल्लामसलत करून त्याला/तिला प्रोत्साहित करण्याची योजना बनवू शकता. आपण त्यांना अशी साधने पुरवू शकता ज्याने त्यांच्यात अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता विकसित होईल.

 

  1. माझ्या पाल्याला गुंतवून ठेवता यावे यासाठी मी कोणत्या गतिविधी घरच्या घरी करू शकतो?

 

घरी करण्याच्या गतिविधींनी तुमच्या पाल्याची उत्सुकता उचंबळून यायला हवी. त्यांनी शाळेत शिकलेल्या कौशल्य बांधणीला तसेच शिकवणीला सार्थ ठरायला हवे.

 

  1. माझे पाल्य सामाजिक कौशल्यांमध्ये प्रगती करत राहील तसेच वर्गमित्रगणांसोबत मैत्री जोपासेल हे कसे सुनिश्चित करायला हवे?

 

आपल्या पाल्याची शाळेतील वागणूक समजुन घेण्याने त्यांना उत्तमरीत्या मार्गदर्शन करण्यात सहाय्य होईल. त्यांच्या शिक्षकांसोबत झटपट साधलेल्या संवादाने त्यांच्या समस्यापूर्ण क्षेत्रांना हेरण्यात मदत होऊ शकते. त्याकरवी आपण आपल्या पाल्याला त्यांच्या वागण्याच्या दृष्टीने योग्य दिशेने वळवू शकता तसेच त्यांच्या वर्गमित्रगण तसेच मोठ्यांसोबतही उत्तम मैत्री टिकवण्यात सहाय्य पुरवू शकता. 

आपल्या पाल्याच्या शिकक्षकांसोबत संगनमत साधण्याच्या प्रभावी रीतींबाबत आणखी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबिनारला ट्यून इन व्हा –

https://www.dellaarambh.com/webinars/