तुमच्या मुलांसह आंतराराष्ट्रीय महिला दिन कसा साजरा करावा ?

जगभरात दरवर्षी 8 मार्च या दिवशी आंतराराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. अशा ऐतिहासिक दिवशी महिला करत असलेला त्याग आणि त्यांची समाजातली शक्ती याविषयी मुलांना माहिती मिळणं गरजेचं आहे.

तुम्ही तुमच्या मुलासह एक अर्थपूर्ण आणि शैक्षणिक महिला दिन कसा साजरा करु शकता याची ही माहिती.

रात्री चित्रपट बघण्याचं ठरवा

मुलांना प्रेरणादायी ठरतील अशा सशक्त महिला व्यक्तिरेखा अनेक चित्रपटांमध्ये असतात. तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार त्याच्यासह असा चित्रपट पहा की ज्यात महिलांच्या सबलत्वाचं चित्रण असेल.

ऑनलाईन चरित्र वाचा

आजच्या काळात कर्तृत्ववान महिलांची चरित्रं ऑनलाईन उपलब्ध आहेत. ती आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी आदर्श आहेत. तुम्ही आणि तुमचं मूल त्यातून ज्यांनी आयुष्यात विलक्षण गोष्टी साध्य केल्या आहेत अशा डिझायनर्स, कलावंत ते वैज्ञानिक अशा कर्तबगार महिलांच्या आयुष्याची माहिती करुन घेऊ शकता.

एकत्र स्वयंपाक करा

तुम्ही तुमच्य मुलासह काही रोचक पदार्थ बनवू शकता. त्यांना यूट्यूबवर पाककृती शोधून स्वतः रात्री काय जेवणं बनवायचं ते ठरवू दे. त्यातून त्यांना हे कळेल, की स्वयंपाक करणं हे आयुष्यातलं एक सर्वसाधारण कौशल्य आहे आणि ते फक्त बाई किंवा पुरुषाने करायचं काम नाही.

स्पर्धात्मक खेळ खेळा

तुम्ही मजेशीर आणि स्पर्धात्मक खेळ एकत्र खेळले पाहिजेत. बहुतेक सगळ्याच मुलांना खेळ खेळायला आवडतात आणि आपण मोठी माणसं त्यांच्यासाठी वेळ देऊ शकत नाही. तुम्हाला ऑनलाईन असे अनेक मजेदार खेळ सापडतील.

त्यांना व्हर्चुअल शुभेच्छापत्र बनवायला मदत करा

आतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी तुमच्या मुलांना ऑनलाईन शुभेच्छापत्र तयार करण्यासाठी आणि ती शिक्षक आणि कुटुंबियांना पाठवण्यासाठी प्रोत्साहन द्या.

अशा मजेदार मार्गांनी तुम्ही तुमच्या मुलाला आंतरराष्ट्रीय महिला दिनाची माहिती देऊ शकता आणि तुमचा वेळही छान जाईल.