पालकांनो, तुमच्या मुलासाठी पहिला लॅपटॉप विकत घेताना हे लक्षात ठेवा

संगणक आणि लॅपटॉप हे आपल्या दैनंदि आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. आपण सगळेच ते नियमित वापरत असतो, त्यामुळे तुमच्या मुलाने त्याची मागणी केली, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. जसा संगणकाचा आकार लहान होत गेला, तसं संगणक शिकण्याचं वयही लहान होत गेलं.

तुमच्या मुलाचं वय ध्यानात असू द्या

आज ना उद्या मुलं अधिक स्वातंत्र्य आणि खासगीपणा शोधायला लागतील, त्यामुळे त्यांच्यासाठी लॅपटॉप घ्यायला पैसे गुंतवल्यामुळे त्यांना शिकायला आणि त्यांचा पूर्ण क्षमतेनं विकास व्हायला मदत होईल. एका विशिष्ट वयात त्यांच्यात अमूर्त विचार करण्याची क्षमता निर्माण होते आणि त्यांना गुंतागुंतीचे काळावर आधारित असलेले खेळ आणि कृती आवडायला लागतात. तसंच ती ऑनलाईन नवी कौशल्यंही आत्मसात करतात.

तुमच्या मुलाला काय आवडतं?

लॅपटॉप विकत घेण्याआधी, तुम्ही तुमच्या मुलासाठी ही गुंतवणूक का करत आहात याचा विचार करा.तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाला पूरक म्हणून हा संगणक घेत आहात की गेम खेळण्यासाठी आणि चित्रपट बघण्यासाठी? उद्देश काहीही असला, तरी तुमच्या मुलाची आवड आणि सुरक्षितता यांचा आधी विचार नक्की करा.

तुमची खर्चाची मर्यादा ठरवा

आज विविध प्रकारचे लॅपटॉप्स बाजारात वेगवेगळ्या किंमतीला उपलब्ध आहेत. तुमची खर्चाची मर्यादा आणि आवश्यक वैशिष्ट्यं यांचा मेळ घालून तुम्ही तुमच्या मुलाच्या आयुष्यात सहज सामावून जाईल असा लॅपटॉप निवडू शकता. जर तुम्ही महागातला लॅपटॉप घेणार असाल, तर तुमच्या मुलाला मूल्यवान सामग्री हाताळण्याचं प्रशिक्षण अवश्य द्या.

हवी असलेली वैशिष्ट्य बघा

महत्वाचं म्हणजे, स्क्रीनचा आकार, लॅपटॉपचं वजन आणि टिकाऊपणा ही वैशिष्ट्यं महत्वाची आहेत. 12 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी, तुम्ही शक्यतो लहान आणि हलक्या लॅपटॉपची निवड केली पाहिजे. तुम्ही जो लॅपटॉप निवडाल, त्याचं टिकाऊपणा हे वैशिष्ट्य असल्याची खात्री करुन घ्या.

तुमच्या मुलासाठी परिपूर्ण शिक्षण-स्रोत निर्माण करण्यासंबंधी अधिक माहितीसाठी आमचे वेबिनार अवश्य बघा.

https://www.dellaarambh.com/webinars/