परिस्थिती सामान्य झाल्यावर शिक्षणाच्या हायब्रीड मॉडेलशी जुळवून घेण्यासाठी तुमच्या मुलाला कशा रीतीने मदत करायची ते शिकून घ्या

मागील दोन वर्षांमध्ये, जगात लॉकडाऊन असताना आपले आयुष्य जगण्यास मदत करण्यासाठी  प्रत्येक गोष्ट डिजिटल माध्यमात बदलली आहे. परिणामी, ऑनलाइन क्लासेस नवी सामान्य बाब बनली आहे. प्रकरणे कमी झाल्याने आता शाळा उघडत असल्यामुळे, अनेक मुलांना परत शाळेत जाणे कठीण होत आहे. पटकन जुळवून घेणे काहीसे कठीण आहे. हे जुळवून घेणे सुरळीत होण्यासाठी मदत मिळावी म्हणून खाली काही टिप्स दिले आहेत:

 

  1. नवा नित्यक्रम: जेव्हा तुमची मुले परत शाळेला जायला लागतील, तेव्हा त्यांच्या दैनंदन जीवनातील अनेक गोष्टी बदलणार आहेत. त्यामुळे त्यांना विशिष्ट शालेय दिवसाबद्दल माहिती दिल्याने या बदलास अनुकूल होण्यासाठी त्यांना मदत मिळेल. 
  2. झोपेचे वेळापत्रक: ऑनलाइन अभ्यास केल्याने झोपेच्या वेळापत्रकावर देखील बराच प्रतिकूल परिणाम झाला आहे. आठ तासांची पूर्ण झोप मिळण्यासाठी, त्यांना अंथरुणावर लवकर जाण्यास लावून आणि त्यांच्या शाळेच्या नेहमीच्या वेळेवर उठवून त्यांच्या झोपण्याच्या वेळेचे नित्यक्रम निश्चित करू शकता.
  3. संवाद महत्त्वाचा आहे: तुमच्या मुलाला अशा मोठ्या बदलाशी जुळवून घेणे थोडे कठीण होऊ शकते. तुम्ही त्यांच्याशी योग्य संवाद साधण्याची आणि त्यांचे ऐकून घेतल्याची जाणीव देण्याची खात्री करा. समस्या कायम राहिल्यास त्यांची शाळा किंवा एखाद्या विश्वसनीय शिक्षकाशी संपर्क साधा. 
  4. जुळवून घेण्यास त्यांना मदत करणे: जुळवून घेण्यासाठी प्रत्येक मुलाला वेगवेगळा वेळ लागतो. तुमच्या मुलाच्या गतीस जाणून घ्या. त्यांना काही समस्या येत असेल, तर तुमच्याकडे मार्गदर्शन आणि समर्थनासाठी विचारण्याची त्यांना मोकळीक द्या. 

 

तुमच्या डिजिटल झालेल्या मुलांना मोठे करण्यासाठी कसे सुसज्ज बनावे आणि तयारी करावे हे शिकून घ्या. आमच्या वेबिनारला भेट द्या - https://www.dellaarambh.com/webinars/