तुमच्या मुलाला ई-शिक्षणाचा फायदा का होईल, याची 5 कारणं

 

सध्या ऑनलाईन शिक्षणाला अनन्यसाधारण ऊर्जितावस्था प्राप्त झालेली आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत. अहवालांनुसार, भारतातली ऑनलाईन शिक्षणाची बाजारपेठेचं मूल्य 2024 पर्यंत 360 रुपये एवढं वाढणार आहे.

पालक म्हणून, तुमच्या मनात ई-शिक्षण आणि त्याच्या आपल्या मुलावर होणार्&zwjया परिणामाबद्दल शंका असणं रास्तच आहे. आपल्या मुलाची शिकण्याची क्षमता आणि सर्वांगीण अनुभव यांचा जास्तीतजास्त विकास होण्याबरोबरच ऑनलाईन शिक्षणाचे इतर बरेच फायदे आहेत.

असे आहेत फायदे-

आपल्या मुलाला अधिक जबाबदार बनवतं

ई-शिक्षणादरम्यान, आपल्या मुलाला असाइनमेंट सबमिट करण्यासाठी आणि वर्गातील चर्चेत सहभागी होण्याची आठवण करून देण्यासाठी कोणीही प्रत्यक्ष उपस्थित नसतं. हे त्यांना लहान वयातच आत्म-प्रेरित करेल.

कुतूहल आणि शिकण्याच्या तीव्र इच्छेला ई-शिक्षण खतपाणी घालतं.

सध्या खूप मोठ्या प्रमाणात ऑनलाईन माहिती उपलब्ध आहे. ऑनलाइन शिक्षणात विविध प्रकारे सहभागी होऊन  तुमचं मूल त्याला ज्यात रस आहे आणि  किंवा ज्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे, अशा विषयांबद्दल माहिती घेऊ शकेल.

मुलं अधिक व्यवस्थित होतात

वर्गातल्या फाइल्स नीट वापरुन, इतर विद्यार्थ्यांशी समन्वय साधून आणि असाइनमेंट सबमिट करुन तुमच्या मुलाला संस्थात्मक कौशल्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. यामुळे लहान वयातच कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचं हे त्यांना शिकता येईल.

वैयक्तिक शिक्षण

दृक्, श्राव्य किंवा लिखित मजकुरासारख्या अनेक मार्गांनी आपल्या मुलाला त्याला सोयीस्कर असलेल्या रुपात शिक्षण घेता येईल.  शिक्षकांशी ऑनलाईन संपर्क साधून किंवा स्वतःहून निराकरण करूनही त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात मुलं सक्षम असतील.

करमणुकीऐवजी शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

आपलं अपत्य नेहमीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रीय असतं याची तुम्हाला काळजी असेल, तर ई-लर्निंग ही चिंता कमी करतं. ऑनलाइन उपलब्ध असणा शिक्षणाच्या असंख्य संधींमुळे मुलं मनोरंजन व्यतिरिक्त इतर शैक्षणिक कारणांसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करतील.

तुमच्या मुलांना शिक्षणाच्या या प्रकाराशी जुळवून घ्यायला प्रोत्साहन द्या, कारण यामुळे त्यांना आयुष्यभर यशस्वी स्वभाववैशिष्ट्यं आणि महत्वाकांक्षी वृत्ती विकसित करण्यास मदत होईल