शिक्षक - शाळापूर्व ऑनलाईन शिकवण्यासाठी 5 टिप्स

शाळेपूर्वीचं शिक्षण देणं अतिशय आव्हानात्मक असतं. शाळापूर्व शिक्षण आता दूरशिक्षणात परिवर्तित झाल्यामुळे, शिक्षण परिणामकारक होण्यासाठी वर्गात कार्यक्षमता आणि शिस्त कायम राखणं शिक्षकांसाठी महत्वाचं आहे.

3 आणि 4 वर्षाच्या मुलांना ऑनलाईन शिकवण्यातल्या गुंतागुंतीमुळे बहुतेक शाळापूर्व शिक्षकांच्या चिंतेत वाढ झालेली दिसते. म्हणूनच, गाभा-मूल्य कायम राहणं आवश्यक आहे.

शिक्षकांना भेटा या व्हर्चुअल मेळाव्याचं आयोजन

वर्षाची सुरुवात शिक्षकांना भेटा या उपक्रमापासून केली, तर ती भक्कम वर्ग-समुदायाच्या पायाभरणीची एक नामी संधी ठरु शकते. पालक आणि विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख करुन द्या. त्यांना मोकळं वाटू द्या.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची माध्यमं तुमचे सर्वोत्तम मित्र ठरणार आहेत

तुम्हाला बघणं, तुमचा आवाज ऐकणं, आणि तुमच्याशी तसंच इतर वर्गमित्रांशी बंध जुळणं हे तुमच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे. त्यांना भिऊन जाऊ नका. तुम्ही तुमच्या विद्यार्थांना वर्गात जसं शिकवलं असतं आणि त्यांची काळजी घेतली असती, तसंच इथेही करा, फक्त व्हिडिओच्या माध्यमातून.

स्वतःला जरा मुभा द्या

व्हर्चुअल माध्यमातून शाळापूर्व शिक्षण देणं अतिशय कठीण आहे. धीर धरा, सकारात्मकता बाळगा आणि मुलांना गुंतवून ठेवायला विसरु नका. तुम्हाला प्रत्येक वेळी सर्वोत्तमच असलं पाहिजे असं नाही. स्वतःची काळजी घ्यायला विसरु नका, मध्ये विराम घ्या आणि एकटं राहून थोडासा वेळ स्वतःसाठी काढा.

तुमचे पाठ केंद्रित आणि उपक्रम अर्थपूर्ण असू द्या.

पोस्टर्स, अँकर चार्टस्, व्हाईटबोर्डस्, व्हिडिओ ट्यूटोरियल्स किंवा कामाची उदाहरणं यांचा वापर करा. मुलांना त्यांनी शिकलेल्या गोष्टींचा खरोखर वापर करता येईल, अशा उपक्रमांचा अभ्यासात समावेश करा. तुमचा पाठ छोट्या भागांमध्ये विभागण्याचा प्रयत्न करा.त्यात खूप हालचालीचा समावेश असू द्या.

तुमच्या विद्यार्थांना प्रोत्साहन द्या

जेव्हा त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांचं कौतुक करता आणि त्यांना बक्षिस देता, तेव्हा त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि त्यांच्यात पुन्हा पुन्हा चांगली कामगिरी करण्याची जिद्द निर्माण होते. विद्यार्थ्यांना डिजिटल बक्षिसं किंवा प्रमाणपत्रं देणं किंवा ऑनलाईन वर्गात लक्ष द्यायला ज्या विद्यार्थ्यांना अडचणी येत असतील त्याच्याशी थेट फोनवर बोलणं- यामुळे तुम्हाला त्यांच्याशी एक विश्वासाचं नातं निर्माण करण्यात मदत होईल.

तुमची इ-शिक्षण कौशल्यं विकसित करण्यासाठी आमच्या वेबिनारमध्ये सहभागी व्हा आणि तुमचे वर्ग अधिक प्रभावी होऊ द्या.

https://www.dellaarambh.com/webinars/