ऑनलाईन लेक्चरला उपस्थित राहताना लक्षात ठेवायच्या 6 गोष्टी

 

ऑनलाईन लेक्चर हे शिक्षणाचं भविष्य आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे ही लेक्चर्स हा सुरुवातीला आपण आणि शिक्षक दोघांसाठीही परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रकार असू शकतो.

 

तुम्हाला मदत करण्याच्या उद्देशाने, ऑनलाइन शिकण्याच्या  मजेदार अनुभवासाठी आम्ही व्हिडिओ शिष्टाचाराच्या सहा सोप्या प्रयुक्त्या एकत्र केल्या आहेत.

 

पार्श्वभूमीला नको असलेले आवाज येत असल्यास स्वत:चा माइक म्यूट करा 

ज्यांचा आपल्या सहाध्यायी आणि शिक्षकांना त्रास होईल अशा काही गोष्टी तुमच्या सभोवताली असू शकतात,  उदा. एकमेकांवर आपटणारी भांडी. आपण घरात अशा प्रकारची गडबड अनुभवत असल्यास, आधी तुमचा माइक म्यूट करा.

 

बंद करायला सांगेपर्यंत तुमचा व्हिडिओ नेहमीच चालू ठेवा

ऑनलाईन वर्गाला गुंतवून ठेवणारा आणि परस्परसंवादी बनविण्यासाठी, आपला व्हिडिओ नेहमीच चालू ठेवा. तुमचे शिक्षक कोऱ्या स्क्रीनशी बोलले तर तुम्हाला नक्कीच आवडणार नाही. जर तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला तसं विशेषकरुन सांगितलं, तरच व्हिडिओ बंद करा.

 

नोट्स घेण्यासाठी एक पुस्तक आणि पेन हाताशी ठेवा 

शिकण्याचं माध्यम वेगळं असलं तरी अनुभव तसाच आहे. आपले शिक्षक बोलत असताना महत्त्वाच्या नोट्स टिपून घेण्यासाठी आपलं पुस्तक आणि पेन हाताशी आहे याची खात्री करा.

 

संक्षिप्त शब्द आणि अशिष्ट शब्द वापरणं टाळा

लेक्चरमध्ये संक्षिप्त शब्द आणि अपशब्द वापरू नका. आदरपूर्वक बोला. आपण प्रत्यक्ष वर्गात जे शिष्टाचार पाळतो तेच इथेही पाळा.

 

नेहमी वेळेवर उपस्थित रहा

आपल्या फायद्यासाठी ऑनलाइन माध्यम वापरा. लेक्चर सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी वेटिंग रूममध्ये जा. त्यामुळे तुम्हाला लेक्चरसाठी योग्य मनस्थिती तयार व्हायला मदत होईल आणि संकल्पना जलद समजतील.

 

सहभागी व्हा आणि प्रश्न विचारा

समरस व्हा, प्रश्न विचारा आणि आपण एखाद्या प्रत्यक्ष वर्गात जशा शंका विचारु, तशाच इथेही विचारा. या माध्यमाचं स्वरूप लक्षात ठेवा. जेव्हा कोणी बोलत असेल तेव्हा व्यत्यय आणू नका.

 

या प्रयुक्त्या तुमच्या पुढच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये अंमलात आणा आणि ऑनलाईन शिक्षणाचा आनंद अनुभवा.