मुलांच्या इंटरनेट-वापर कालावधीच्या व्यवस्थापनाविषयी 3 परिणामकारक टिप्स

 

मुलांना इंटरनेट आवडतं ते गेम्स खेळण्यासाठी आणि सतत स्क्रोलिंग करण्यासाठी. सतत शिक्षणासाठी आणि मनोरंजनाच्या वैविध्यपूर्ण सामग्रीसाठीही.

 

मात्र, खरी समस्या इथेच आहे. बऱ्याचदा, स्क्रोलिंग ही एक निर्बुद्ध कृती बनते आणि टीव्हीवरचे कार्यक्रम आणि कार्टून बघताना खूप वेळ जाणं घातक असतं. म्हणूनच, तुम्हाला पालक या नात्यानं ज्यांचा तात्काळ वापर करुन आपल्या पाल्याचा इंटरनेट वापराचा, तसंच स्क्रीनवर घालवलेला वेळ वाचवू शकता.

 

  1. नवी कौशल्यं शिकण्याला प्रोत्साहन द्या.

 

मुलं विविध माध्यमं आणि इ-शिक्षणाच्या मार्गांचा, तसंच ॲप्सचा वापर ओरिगामी आणि विज्ञान प्रकल्पांसारखी नवी कौशल्यं आत्मसात करण्यासाठी, तसंच गाणं आणि नवी भाषा शिकण्यासाठी करत आहेत, याची खातरजमा करा.

 

त्यांनी केलेलं काम जगासमोर आणा. तुमच्या मुलांना शक्य तेवढा जास्त प्रतिसाद मिळू द्या. इंटरनेट, मुलं आणि तंत्रज्ञान यासारख्या उपक्रमांचा वापर तुमच्या फायद्यासाठी करा. आमच्यावर विश्वास ठेवा. थोड्याच वेळात, मुलं केवळ कोचावर पडून कार्टून बघण्यापेक्षा रोज खूप जास्त सकारात्मक कृती करायला लागतील.

 

  1. छंद आणि विश्लेषणात्मक विचारांना प्रोत्साहन द्या.

 

पाठ्यक्रमाबाहेरच्या उपक्रमांसाठी क्लासेस लावायला तुमच्या पाल्यांना प्रोत्साहन द्या. कदाचित तुमच्या पाल्याला पियानोसारखं एखादं वाद्य शिकण्यात रस असू शकेल. असे कोर्सेस असलेले खूप ऑनलाईन मंच आहेत. पाल्याला हळुवारपणे त्याचा छंद जोपासण्यासाठी प्रवृत्त करा.

 

तुम्ही त्यांना सहज उपलब्ध असलेले सुडोकू आणि क्रॉसवर्डसारखे बुद्धीचा विकास करणारे ऑनलाईन गेम्स खेळायला प्रवृत्त करु शकता. यामुळे त्यांची स्मरणशक्ती आणि तर्ककौशल्य यात वाढ होईल.

 

क्लॉकवर्क ब्रेन किंवा ब्रेनबीन यासारखी ॲप्स तुमच्या मुलांच्या बुदधीमत्तेला कोडी,स्मरणशक्ती आणि शैक्षणिक खेळांच्या माध्यमातून आव्हान देऊन शिक्षणही देतील. विश्लेषणात्मक विचारशक्ती 21 व्या शतकात अत्यावश्यक आहे आणि उद्याच्या सगळ्या मुलांनी ती विकसित करणं आवश्यक आहे.

 

  1. मार्गदर्शित आणि मर्यादित वापर

 

‘मार्गदर्शित वापर’या सारखी वैशिष्ट्यं तुम्ही एखाद्या ॲपवर घालवलेला वेळ नियंत्रित करतात. तुम्ही विविध ॲप्ससाठी वेगवेगळ्या मर्यादा निश्चित करु शकता आणि त्यात गेम्स आणि स्ट्रीमिंग ॲप्सवर जास्त नियंत्रण घालू शकता. मार्गदर्शित वापरामुळे तुमच्या मुलांना त्यांचा तंत्रज्ञान वापराचा वेळ जास्त सृजनशील पद्धतीने वापरायला मदत होईल.