विद्यार्थ्याच्या शैक्षणिक यशामध्ये तंत्रज्ञान 360⁰ चा दृष्टीकोन कसा आणतं याचं हे उदाहरण

360⁰ चा दृष्टीकोन विद्यार्थ्यला जिथे शिक्षण उपलब्ध आहे, अशा सर्व मार्ग आणि संपर्कबिंदूना कवेत घेतो. प्रयोगशाळा असोत, ते ज्या माध्यमातून सामग्री वापरतात ते माध्यम असो, किंवा थेट शिक्षण असो, 360⁰ चा दृष्टीकोन समग्र विकासाला चालना देतो.

आज तंत्रज्ञान शिक्षणाच्या या सर्वंकष दृष्टीकोनाचं नेतृत्व करत आहे. त्यातून शिक्षणाच्या इ-बुक्स,पीडीएफ, दृक्-श्राव्य शिक्षण, आमंत्रित व्याख्याता, जागतिक शिक्षणवर्ग, थेट शिक्षण, प्रत्यक्ष प्रतिसाद आणि वर्गातलं शंकानिरसन यासारख्या परस्पर संवादी आणि गुंतवणाऱ्या पद्धती पुढे येत आहेत.

याचे अनेक फायदे आहेत:

 

  • वैयक्तिक शिक्षण

डिजिटल शिक्षण विद्यार्थ्यांना शिकण्याचे विविध मार्ग उपलब्ध करुन देतं. हे पारंपरिक शिक्षणपद्धीत शक्य नाही. विद्यार्थी त्यांना सोयिस्कर अशा स्वरुपात शिक्षण घेऊ शकतात. उदा.दृक्-श्राव्य, एकास एक थेट शिक्षण, इ-बुक्स इ.

 

  • लक्षात राहण्यात सुधारणा

जेव्हा विद्यार्थी त्यांना सोयिस्कर अशा माध्यमातून, मग ते श्राव्य,दृश्य किंवा मजकूर काहीही असो, शिक्षण घेतात, त्यांना शिकलेलं जास्त काळ लक्षात राहतं.

 

  • सक्रीय सहभाग

विद्यार्थ्यांना गुंतवणाऱ्या सादरीकरणासारखे शिक्षणाचे रोचक मार्ग वापरुन शिक्षक वर्गात सक्रीय सहभागाचं वातावरण निर्माण करु शकतात.

 

  • सहयोगात्मक आणि एकास एक थेट शिक्षण

ऑनलाईन वर्ग, असाईनमेंटस् आणि प्रत्यक्षातल्या अपडेटसच्या माध्यमातून विद्यार्थी एकमेकाशीं माहिती शेअर करु शकतात, त्यातून ते एकमेकांकडून शिकतात आणि त्यांचा विकास होतो.

 

  • त्यांना भविष्यासाठी तयार व्हायला मदत करतं

भविष्यकाळ हा डिजिटल असणार आहे. संगणक शिक्षणासारख्या उद्याच्या साधनांशी विद्यार्थ्यांची ओळख करुन दिल्यामुळे ते लहान वयापासूनच अत्यावश्यक अश्या कौशल्यांसह भविष्यासाठी सज्ज होतील.

 

डेल आरंभमध्ये डिजिटल भारताचं स्वप्न साकारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या शक्तीविषयी पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जागरुकता निर्माण करणं हे आमचं उद्दीष्ट आहे. देशभरात संगणक-आधारित शिक्षणाला वर्गात आणून आम्हला आजच्या विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता, तर्कनिष्ठ विचारसरणी आणि गुंतीगुंतीच्या समस्या सोडवण्याची क्षमता रुजवायची आहे. कारण आजचे विद्यार्थी हेच उद्याचं भवितव्य आहेत.