तुमच्या मुलाच्या ऑनलाईन सुरक्षेचे 5 मार्ग

आजच्या वाढत्या डिजिटल जगात, आपली मुले आपला बराच वेळ ऑनलाइन वेळात घालवित आहेत. वर्गांपासून ते विश्रांतीपर्यंत आणि सामाजिक संवादापर्यंत त्यांच्या जीवनाचा एक मोठा भाग ऑनलाइन जगात संक्रमित झाला आहे.

तुमच्या मुलांनी ऑनलाइन जगातील लोकांशी संवाद साधताना ती सुरक्षित राहतील याची खातरजमा तुम्ही पालक म्हणून करणे आवश्यक आहे . अशी खात्री करण्यासाठी तुम्ही ही 5 पावले उचलू शकता:

जागरुकता वाढवणे

त्यांना ऑनलाईन जगातल्या धोक्यांची जाणीव करुन देणे सगळ्यात महत्वाचे आहे. त्यांना पासवर्ड गुप्त ठेवण्याचे महत्त्व सांगा आणि सायबरसुरक्षेसारख्या संकल्पनांशी त्यांचा परिचय करुन द्या.

तुमच्या मुलाची ओळख सुरक्षित ठेवा

वैयक्तिक माहिती इंटरनेटवर शेअर करण्याच्या जोखमीबद्दल तुमच्या मुलांशी बोला. वैयक्तिक माहितीमध्ये फोन नंबर आणि पत्ते यासारख्या संवेदनशील माहितीचा समावेश असू शकतो.

तुमचा संगणक सुरक्षित ठेवा

जागरूक करा आणि सुरक्षित राहण्यासाठी आपली सॉफ्टवेअर सुरक्षितता अपडेट करा.

ऑनलाईन कृतींवर लक्ष ठेवा

इंटरनेटवर सगळ्या प्रकारची सामग्री असते. पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना अयोग्य गोष्टींपासून दूर ठेवले पाहिजे. यासाठी तुम्ही पेरेन्टल कंट्रोल या पर्यायाचा वापर करु शकता.

सायबर गुंडगिरीला आळा घाला

तुमची मुलं इंटरनेटवर काय पोस्ट करतात याचा नीट विचार करायला तुम्ही त्यांना शिकवले पाहिजे. ऑनालाईन असताना इतरांशी निष्ठुरपणे किंवा  दु्ष्टपणे वागण्याचे काय परिणाम होऊ शकतात ते तुम्ही त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे.

तुमच्या मुलांना या गोष्टींविषयी सांगून तुम्ही त्यांच्या ऑनलाईन शिक्षणाचा अनुभव सुरक्षित असेल याची खातरजमा कराल.

मुले ऑनलाईन शिकताना सुरक्षित आहेत याची खात्रजमा करण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या वेबिनारमध्ये सामील व्हा - https://www.dellaarambh.com/webinars/