तुम्हाला माहित असाव्यात अशा पीसी शी संबंधित 10 संज्ञा

पीसी म्हणजे तुमचे आवडते खेळणे, तुमचे ग्रंथालय आणि सर्व प्रकारच्या मनोरंजनाचे साधन असते. घरी तसेच शाळेत सुद्धा जर पीसी चा वापर करता आला, तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य मिळते. पीसीच्या मदतीने अभ्यास करताना तुम्ही ती माहिती केवळ वाचत नसता तर व्हिडिओज, आकृत्या इत्यादी गोष्टींच्या मदतीने ते दृश्य स्वरूपात पाहून शिकत असता.

पण तुमच्या पीसीच्या आत जे आहे त्याचे काय?

तुम्हाला माहिती असाव्यात अशा पीसी शी संबंधित 10 संज्ञा पुढे दिल्या आहेत:

 

वायरस म्हणजे कोड चाच एक भाग असतो, जो स्वतःच्या प्रती निर्माण करून तुमच्या सिस्टमला बिघडवणे, डेटा नष्ट करणे इत्यादी वाईट गोष्टी करण्यास सक्षम असतो.

 

 

बॅकअप किंवा बॅकिंग अप ची प्रक्रिया म्हणजे, तुमच्या कंप्युटर वरील डेटाच्या प्रती निर्माण करून त्या इतरत्र साठवून ठेवणे. जेणेकरून मुख्य डेटा जर नष्ट झाला तर त्या प्रतींचा वापर करून सर्व माहिती परत मिळवता येऊ शकते.

 

 

डेटा चा अर्थ असतो, कंप्युटर किंवा स्मार्टफोन वरील प्रसारित करता येण्यासारखी व साठवून ठेवता येण्यासारखी माहिती. उदाहरणार्थ - तुम्हाला दिले गेलेले काम, चित्रे किंवा व्हिडिओज्.

 

 

डेस्कटॉप कंप्युटर म्हणजे तुमच्या वैयक्तिक वापरासाठी तयार केला गेलेला कंप्युटर. नियमितपणे एकाच ठिकाणी बसून काम करायचे असल्यास, त्याच्या आकार आणि विद्युत प्रवाहाच्या आवश्यकतेमुळे डेस्क किंवा टेबल वर हा ठेवला जातो.

 

 

कर्सर म्हणजे, कंप्युटरच्या स्क्रीन वर दिसणारा हलते चिन्ह. हा, वापरकर्त्याने दिलेल्या इनपुट नुसार ठराविक ठिकाणी निर्देश करतो.

 

 

होमपेज हे सामान्यतः एखाद्या वेबसाइटच्या परिचयाचे पान असते. त्यावर त्या साइटबद्दलची माहिती, साइटवर उपलब्ध गोष्टी इत्यादी दिलेल्या असतात. किंवा इंटरनेटच्या ब्राउजरचे ते डिफॉल्ट (निश्चित केलेले) वेबपेज असते.

 

 

पासवर्ड म्हणजे अशी अक्षरे किंवा असे वर्ण ज्यांचा वापर करून कंप्युटर, इमेल किंवा इतर संरक्षित सिस्टम मध्ये लॉगइन करता येते.

 

 

सोप्या शब्दांत सांगायचे तर सॉफ्टवेयर म्हणजे, मायक्रोसॉफ्ट वर्ड वर निबंध लिहिण्यासारखी ठराविक कामे करण्यासाठी पीसी ला दिल्या जाणा-या

 

 

स्क्रीनसेवर म्हणजे, ठराविक कालावधीनंतर कंप्युटरच्या स्क्रीन वरील स्थिर चित्र बदलणारे ॲनिमेशन किंवा प्रतिमा.

 

 

शॉर्टकट म्हणजे, फाईल, वेबसाइट किंवा इतर डेटा कुठे आहे त्याची माहिती त्वरित मिळविण्यासाठी तयार केलेली नोंद किंवा कीबोर्ड वरील कमांड्स. उदाहरणार्थ डेटा कॉपी करण्यासाठी वापरला जाणारा शॉर्टकट म्हणजे Ctrl + C.

दैनंदिन अभ्यासासाठी शाळेत किंवा घरी पीसी चा वापर करताना तुम्हाला अजूनही अनेक संज्ञा शिकायला मिळतील. तसेच गृहपाठ करताना देखिल त्याची मदत होईलच. शिकण्यासाठी शुभेच्छा !