तुम्ही वापरून बघितले पाहिजेत असे 10 टाइपिंग गेम्स!

 

 

आपण जेव्हा टाइपिंगचा विचार कतो, तेव्हा फक्त दोनच गोष्टींना महत्व असते - अचूकपणा आणि वेग. तुम्हाला तुमच्या वर्गमित्रांच्या इतके वेगात टाइपिंग करता येत नसल्यामुळे तुम्ही मागे पडत आहात अशी कल्पना करा. पण चांगली गोष्ट ही आहे की सराव केल्याने अचूकपणा येतो हे अगदी खरे आहे.

1. टाइपरेसर

टाइपरेसर ही एक जागतिक स्तरावरील टाइपिंगची स्पर्धा असते ज्याचा वापर करून तुम्ही जगभरातील अनेकांशी स्पर्धा करता करता तुमचा टाइपिंगचा वेग वाढवू शकता.

2. टाइपिंग एलियन

शिकणे मजेदार नसते असे कोणी सांगितले? एकदा टाइपिंग एलियन खेळा आणि मग पहा तुम्हाला त्यात किती मजा येते ते! टाइपिंगमधील कौशल्ये आणि तुमचा वेग वाढविण्यासाठी हा खेळ उत्तम आहे.

3. कीमॅन

तुमचे हात आणि डोळे यांमधील को-ऑर्डिनेशन (समन्वय) वाढवून टाइपिंगचा वेग पटकन वाढविण्यासाठी कीमॅन तुम्हाला (अक्षरे आणि आकडे यांच्यासाठी वेगवेगळ्या) सोप्या ते कठीण अश्या पातळ्या ठरवायला मदत करतो.

4. कीबोर्ड निन्जा

टाइपिंग मध्ये वेग वाढवून अधिक कार्यक्षम होण्यासाठी तुम्हाला कीबोर्ड निन्जा हा खेळ नक्कीच मदत करेल.

5. टाइप-अ-बलून

कठीण, मध्यम आणि सोप्या अश्या पातळ्या असलेला आणि विविध प्रकारचे धडे असलेला आणखी एक खेळ म्हणजे टाइप-अ-बलून. याच्या मदतीने तुम्हाला टाइपिंगचा भरपूर सराव करता येईल.

6. द टाइपिंग ऑफ द घोस्ट्स

हे नाव वाचून भुताटकी असल्यासारखे वाटू शकेल, पण टाइपिंग ऑफ द घोस्ट्स हा एक आव्हानात्मक खेळ आहे ज्यात तुम्ही स्वतःला भुतांपासून वाचवाल आणि ते करत असताना तुमचे हात आणि डोळे यांमधील समन्वय वाढेल.

7. वर्डट्रिस स्क्रॅबल

तुमचे टाइपिंग रिफ्सेक्सेस आणि शब्दसंपदा या दोन्ही गोष्टी वाढविण्यासाठी वर्डट्रिस स्क्रॅबल ही एक चांगली संधी आहे. तुम्ही खेळलेल्या प्रत्येक खेळाबरोबरच तुम्ही एक चांगले "टाइपर" बनावे यासाठी, यामध्ये अनेक सूचना आणि युक्त्या दिलेल्या आहेत.

8. टाइप द अल्फाबेट

टाइपिंगचा वेग वाढविण्यासाठी तुम्हाला टाइप द अल्फाबेट ची खूप मदत होते. तुमच्या वर्गातदेखिल याची स्पर्धा होऊ शकते.

9. फास्ट फायर टाइपर

तुमची शब्दसंपदा वाढवून तुम्हाला टाइपिंग मास्टर बनायची इच्छा आहे का? एखाद्या असाइनमेंट किंवा परीक्षेच्या आधी फास्ट फायर टाइपर हा खेळ खेळा मग तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

10. टाइपिंग मास्टर 10 फॉर विंडोज

टाइपिंग मास्टर 10 फॉर विंडोज हा केवळ एक खेळ नसून तो एक डाऊनलोड करता येण्यासारखा अभ्यासक्रम आहे जो तुम्हाला टाइपिंग मध्ये प्राविण्य मिळवण्यास मदत करतो.

आता सुपर-प्रॉडक्टिव होण्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या पीसी चा पुरेपूर वापर करण्याची गरज आहे. हॅप्पी टाइपिंग!