21 व्या शतकातलं पालकत्व

पालक म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाची तंत्रज्ञानाविषयी वेगळी भूमिका आहे, मात्र आपली मुलं डिजिटल माध्यमांमध्ये बुडून गेलेली आहेत, हे सत्य आपण नाकारु शकत नाही. म्हणूनच, त्याविषयीचं ज्ञान असणं आणि आपल्या मुलांच्या तंत्रज्ञानाच्या वापरावर लक्ष ठेवणं महत्वाचं ठरतं. 

तुम्ही वापरत असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती घ्या

तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपल्या मुलांच्या क्षमतांचा किती विकास होऊ शकतो, याची पालक म्हणून तुम्हाला जाणीव असली पाहिजे आणि तंत्रज्ञानातल्या धोक्यांविषयी तुम्ही मुलांना माहिती दिली पाहिजे.

ऑनलाईन संवाद आणि नियमन

आपली मुलं इंटरनेटवर काय बघतात आणि ऐकतात, कोणाला भेटतात आणि स्वतःविषयी कोणती माहिती देतात, याची पालकांना माहिती असणं गरजेचं आहे.

ऑनलाईन सृजनशीलता आणि एकाग्रता

ऑनलाईन शिक्षणाच्या जगात मुलांचं लक्ष गुंतवण्यासाठी अनेक युक्त्या आणि प्रयुक्त्या आहेत, त्याचा वापर करुन मुलं त्यांच्या सर्वोच्च क्षमतांपर्यंत पोहचू शकतात. 

21 व्या शतकाचे डिजिटल नागरिक या उपक्रमाअंतर्गत आमच्या पालकत्व या विषयावरच्या सत्रात सहभागी व्हा. त्यात आजच्या तंत्रज्ञानाधिष्ठित जगात मुलांचं संगोपन कसं करावं याविषयी पालकांना मदत होण्यासाठी विविध युक्त्या आणि तंत्र याविषयी जाणून घ्या.

https://www.dellaarambh.com/webinars/