तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील तीन असे तरूण भारतीय ज्यांच्या बद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे!

उत्कृष्ट बनण्यासाठी काही वयोमर्यादा नसते. तंत्रज्ञानातील अनेक संशोधकांबद्दल तुम्हाला जरी माहिती असेल, तरी काही संशोधक असे आहेत जे तुमच्या इतकेच किंवा कदाचित तुमच्या पेक्षाही लहान आहेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील या तरूणांच्या संशोधनांनी स

र्वांनाच त्यांचा अभिमान वाटत आहे. 

1. टेनिथ आदित्य - इन्वेन्टर एक्स्ट्राऑर्डिनेअर

 

तुम्ही एडजस्टेबल इलेक्ट्रिसिटी एक्स्टेंशन बोर्ड आणि बनाना लीफ प्रिझर्वेशन टेक्नोलोजी बद्दल कधी ऐकले आहे का? हे शोध टेनिथ ने लावले आहेत. त्याच्या नावावर आत्ताच 17 शोध जमा झाले आहेत. सन 2013 मध्ये राष्ट्रपती भवन मध्ये त्याला प्रशिक्षण देखिल मिळाले आहे. 

2. अंगद दरयानी - दूसरा इलॉन मस्क!

 

मुंबईच्या किशोर वयीन अंगद दरयानी ने ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा वापर करून आंधळ्या लोकांसाठी वर्च्युअल इ-रीडर बनविला, सौर ऊर्जेवर चालणारी बोट बनविली, गार्डिनो नावाची स्वयंचलित बागकाम प्रणाली तसेच शार्कबॉट नावाचा भारतातील सर्वात स्वस्त 3D प्रिंटर बनविला आहे. त्याने शाळेत शिकणे सोडून मुलांसाठी परवडणा-या किंमतीची DIY किट बनविणारी स्वतःची कंपनी सुरू केली.

3. आनंद गंगाधरन आणि मोहक भल्ला - अलौकिक बुद्धीमत्ता असलेली जोडी

 

दिल्ली मधील आनंद आणि मोहक या दोन मित्रांनी मिळून असे शूज बनविले जे मोबाइल चार्जरचे काम देखिल करू शकतात. त्यांनी या चार्जर ला "वॉकी मोबी चार्जर" असे नाव दिले आहे. हे चार्जर 6 व्होल्ट विद्युत निर्माण करू शकतात आणि आपले नेहमीचे चार्जर 5 व्होल्ट विद्युत निर्माण करतात.

या तरूणांनी निर्माण आणि संशोधनासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून घेतला आहे. त्यांनी त्यांच्या विविध प्रयोगामधून हे सिद्ध केले आहे की तुमचे वय कितीही असले तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही काहीही साध्य करू शकता. त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन या मजेशीर तांत्रिक छंदांचा वापर करून तुम्ही देखिल तुमच्या स्वतःच्या संशोधन कार्यास सुरूवात करा.

कोणतेही वय अतिशय लहान नसते आणि कोणतेही स्वप्न खूप मोठे नसते. चला आत्ताच सुरूवात करा.