पुढील ३ पद्धतींनी पीसी (कॉम्प्युटर) तुम्हाला संशोधनासाठी मदत करू शकतो.

 

ह्या डिजिटल युगात, लाखो लोक इंटरनेटवर अक्षरश: असंख्य गोष्टीचा शोध घेत असतात. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या महापुरामुळे आणि असंख्य स्रोतांमुळे जगातली कुठलीही माहिती एका  क्लिकसरशी तुम्हाला मिळू शकते. पण तुम्ही सुरवात कशी करता?[1]

१) वेळापत्रक सांभाळण्याचे आणि वेळ मर्यादा पाळण्याचे महत्त्व

कोणतीही गोष्ट पार पाडण्यासाठी त्यासाठी पूर्व तयारीनिशी उतरणे कधीही उत्तम. त्यामुळे, जेव्हा तुम्ही वेळापत्रक तयार कराल, तेव्हा तुम्हाला जितका वेळ संशोधन करायचे आहे तो वेळ तर समाविष्ट कराच पण बऱ्याचदा तुमच्या या कामात व्यत्यय सुद्धा येईल, त्यामुळे तो वेळ सुद्धा गृहीत धरा. त्यामुळे एखाद्या विषयावरचे संशोधन पूर्ण करण्यासाठी आणि विना-व्यत्यय काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नेमका किती वेळ लागणार आहे, हे समजायला मदत होईल.

२) विकिपीडिया पासून सुरवात करा (पण तेच अंतिम सत्य मानू नका.)

एखाद्या विषयासंबंधीची संक्षिप्त आढावा आणि पुढील माहिती स्रोत माहित करून घ्यायचे असतील तर विकिपीडिया हा एक उत्तम आदर्श आहे. इथे तुम्हाला, तुमचे संशोधन पुढील टप्प्यावर नेण्यासाठी उपयुक्त असे कीवर्ड्स (कळीचे शब्द), माहितीस्रोत, इतर सबंधित आणि सूचित लिंक्स पाहता येतात. पण हा कम्युनिटी जनरेटेड म्हणजेच समाजातील काही घटकांनी निर्माण केलेला माहितीस्रोत असल्यामुळे फक्त ह्यावरच अवलंबून राहू नका.

३) काही ठरावीक वाक्ये (फ्रेजेस), वैशिष्ट्यपूर्ण की-वर्ड्स (कळीचे शब्द) आणि अॅडव्हान्स्ड सर्च फंक्शन यांचा वापर करणे

गुगलचा सर्वोत्तम वापर करा! काही वैशिष्ट्यपूर्ण की-वर्ड्स (कळीचे शब्द), ठरावीक वाक्ये (फ्रेजेस), आणि अॅडव्हान्स्ड सर्च फंक्शन यांसारख्या युक्त्या वापरून, तुम्ही तुम्हाला हवी ती तंतोतंत माहिती मिळवू शकता. उदाहरणार्थ- तुम्ही जर एखादया ठराविक वाक्याशी संबंधित माहिती शोधायची असेल तर ते वाक्य “ ” असे अवतरणचिन्हात टाकून त्याबद्दल सर्च करा.[2]

४) गुगल स्कॉलर आणि गुगल बुक्स यांचा वापर करा.

एखादया हुशार मुलाची जर्नल्स (वह्या) किंवा पुस्तके तुम्हाला मिळणे ह्याहून दुसरी चांगली गोष्ट नाही. तुमच्या एखाद्या अभ्यासविषयाचे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी गुगल स्कॉलर आणि गुगल बुक्स यांना तुमच्या संशोधनात अधिक प्राधान्य दया. त्यामुळे, तुमच्या विषयाशी संबंधित नसलेले इतर हजारो अनावश्यक रिझल्ट्स तुम्हाला बघत बसावे लागत नाही.

५) क्वोरा वापरण्याचे फायदे

क्वोरा हा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचा, नानाविध विषयांवरील चर्चांमध्ये उत्कट सहभाग घेणाऱ्या लोकांचा समूह (कम्युनिटी) आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा, तुमचं अभ्यासविषयाशी संबंधित विविध मतमतांतरे आणि विविध दृष्टिकोन यांच्याविषयी वाचा.
योग्य माहिती आणि विविध टूल्सच्या मदतीने आपण पीसीवर (कॉम्युटरवर) हव्या तेवढ्या गोष्टी शिकू शकतो आणि शोधूही शकतो. परिणामी तुमचा अभ्यास अधिक सुसूत्र आणि मनोरंजक सुद्धा होऊ शकतो. तेव्हा तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा!