पीसी वर उपलब्ध 4 असे खेळ जे मनोरंजक आणि ज्ञान देणारे आहेत

इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम्स मधून होणारे फायदे बघण्याऐवजी आपण पालक नेहमीच त्यातून होणारे दुष्परिणाम शोधायच्या तयारीत असतो. परंतु आत्ताच्या मुलांच्या विश्वात हे गेम्स अतिशय सहजतेने वापरले जातात. जर तुम्हाला हे माहित असेल की नक्की काय शोधायचे आहे, तर तुमच्या मुलांमध्ये काही आवश्यक जीवनकौशल्यांचा विकास करण्यासाठी हे व्हिडिओ गेम्स नक्कीच फायदेशीर ठरतील. केवळ तेवढेच नाही तर, मुलांना मनोरंजनासोबतच ते अत्यंत मौल्यवान अश्या गोष्टी देखिल शिकवतील.

जर तुम्हाला हे माहिती नसेल की तुमच्या मुलांसाठी सुरूवात कुठुन करावी तर पुढे दिलेले ज्ञानवर्धक तसेच मजेशीर व्हिडिओ पहा.

 

1. रीडर रॅबिट

रीडर रॅबिट आणि त्याच्या मित्रांसोबत वैविध्यपूर्ण कौशल्य पातळ्यांसाठी योग्य असे छोटे छोटे खेळ खेळताना तुमचा पाल्य मजेत भाषा, कला, विज्ञान, प्रश्नांची उकल करणे आणि गणित इत्यादी कौशल्ये शिकेल. मुले सिली सँडविच शॉप मध्ये अंक आणि पैसे मोजायला शिकतात, रेनगियर फॉरेस्ट मॅथ मध्ये बेरजा शिकतात, चीज ब्रिक स्पेलिंग मध्ये त्यांची स्पेलिंग्ज बनविण्याची क्षमता विकसित होते, स्पार्कल शेप माइनिंग मध्ये आकार ओळखायला शिकता येते. शैक्षणिक खेळांच्या शृंखलेमधील काही खेळांची ही उदाहरणे आहेत. या व्यतिरिक्त देखिल अनेक खेळ उपलब्ध आहेत. 

 

2. डोरा द एक्स्प्लोरर

तुमच्या मुलांना एखादे विशिष्ट ध्येय मनात घेऊन डोरा आणि तिच्या मित्रांसोबत रोमांचकारक सहलीवर पाठवा. या खेळामधून मुले नकाशे वाचायला शिकतात, प्रश्नांची उकल करायला शिकतात, नविन शब्द आणि तत्थ्ये शिकतात आणि हे सर्व करताना त्यांना अतिशय मजा येते. तुमचा पाल्य आकार, रंग, संख्या आणि शब्द शिकता शिकता डोरा ला तीचे कार्य पूर्ण करण्यास मदत करू शकतो. मुलांना खेळातील पात्रांसोबत संवाद साधण्यास देऊन हा खेळ इतर खेळांच्या तुलनेने पुढची पायरी गाठतो.

 

3. बुकवोरम एडवेंचर्स

या स्पेलिंग संवेदनामध्ये आपल्या मुलाचा शब्द तयार करा आणि पौराणिक श्वापदाची लढाई करा! 2006 मध्ये रिलीझ केले, बुकवोरम एडवेंचर्स एक मजेदार आणि विलक्षण साहसी गेम आहे जे एक आकर्षक संयोजनाने राक्षस आणि शब्दलेखन एकत्र करते. मुलांसाठी शिक्षणाचे शब्दलेखन मजा बनविण्याकरिता डिझाइन केलेले, गेमसाठी विकासकांनी अनेक बक्षिसे जिंकली. शैक्षणिक पण मजेदार, हे सोपे गेम म्हणजे आपल्याला संगणकांविषयी उत्साही होण्याचा, इंग्रजी वाचन आणि शिकण्याची एक उत्तम पद्धत.

 

4. मॅजिक स्कूल बस

तुमची मुले विलक्षण अश्या मिस. फ्रिजल आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत मॅजिक स्कूल बस मधून सहलीला जाऊ शकतात. त्या सहलीमध्ये मुले थोडी मज्जा आणि भरपूर शास्त्रीय शिक्षण घेऊ शकतात. अशी कोणतीही जागा नाही जिथे ही बस तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. टीव्ही वरील प्रसिद्ध कार्यक्रम आणि पुस्तकांवर आधारित या मनोरंजक आणि शैक्षणिक खेळामधून समुद्राच्या तळाशी जाऊन तेथील माहिती मिळवा, मंगळ ग्रहावर जा, पर्जन्यवनात जाऊन तेथील वैविध्य पहा इतकेच नव्हे तर मानवी शरीराची गुंतागुंतीची रचना देखिल तुम्ही शिकू शकता.