पुढील चार प्रकारे पी सी उन्हाळ्याची सुट्टी मजेदार बनवू शकतात

परीक्षा संपल्या आहेत आणि मुलांना खूप लांबलचक कंटाळवाण्या शैक्षणिक वर्षानंतर मोकळा श्वास घेण्याची उसंत मिळाली आहे. मुलांना उन्हाळ्याची सुट्टी खूप आवडते कारण एक तर ती खूप मोठी असते आणि दूसरे म्हणजे शाळेच्या दैनंदिन कंटाळवाण्या वेळापत्रकातून सुटका मिळते. परंतु पालक म्हणून तुमची जबाबदारी असते की मुलांना त्यांना पाहिजे ते करण्यासाठी नुसतेच मोकळे न सोडता त्यांना चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवून मजा करण्यासोबतच शिकाण्याची संधी देणे.

सुट्टीत केल्या जाणा-या अनेक गोष्टींमुळे अभ्यासक्रमातील पाठांचा दैनंदिन जीवनात कसा वापर करावा ते शिकता येते. त्या सर्व गोष्टी मुलांना सृजनशीलता शिकवून प्रयोगातून ज्ञान मिळविण्यास मदत करतात.

उन्हाळ्याच्या सुट्टीतील या चार गोष्टींमुळे तुमच्या पाल्याला तंत्रज्ञानाचा वापर करून नविन कौशल्ये शिकून अगणित शक्यतांचे नविन जग पहाण्यात अतिशय मजा येईल. 

 

1. व्हिडिओ तयार करा

मुलांना आजूबाजूच्या घटना रेकॉर्ड करून पी सी वर त्यांचे व्हिडिओज् बनवायला शिकवा. यामुळे त्यांना तंत्रज्ञानाची माहिती तर मिळतेच शिवाय कथाकथनाचे कौशल्य विकसित होऊन व्हिडिओ चा संवादासाठी वापर करायला शिकता येते.

 

2. ऑनलाइन छोटे कोर्स

त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील लहान लहान ऑनलाइन कोर्ससाठी त्यांचे नाव नोंदवा. यामुळे ते घरात देखिल व्यस्त रहातील आणि त्यांना आवडणा-या विषयात प्रगती करू शकतील. शाळेतील विषय सोडून बाकीच्या त्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये त्यांना हे कोर्स करू द्या.

 

3. ऑनलाइन स्क्रॅपबूक

मुलांना दीर्घकाळ गुंतवून ठेवून सुट्टी मजेदार करण्यासाठी हा एक अतिशय चांगला प्रोजेक्ट आहे. स्क्रॅपबूकींग मुळे मुलांना त्यांच्याकडे असलेली माहिती नोंदवून ठेवण्याची आणि ती उत्तम प्रकारे सादर करण्याची सवय लागते. कागदाचा कचरा करून इकडे तिकडे टाकण्यापेक्षा त्यांना त्यांच्या कल्पना पी सी च्या मदतीने मांडून आठवणींचे जतन करू द्या.

 

4. ऑनलाइन खेळ

सुट्टीत मुलांना ऑनलाइन खेळ खेळायला फार आवडते. त्यातील लीगो, फ्लाइट सिम्युलेटर आणि तश्याच प्रकारचे काही अन्य खेळ तुमच्या पाल्याच्या मेंदूची सृजनशीलता वाढविण्यास मदत करतात.

 

तुमच्या मुलांना खेळ आणि अभ्यास दोन्ही शिकविण्यात पी सी महत्वाची भूमिका बजावतो आणि म्हणूनच तो मुलांचा सुट्टीतील अतिशय चांगला मित्र बनू शकतो. या वर्षीच्या सुट्टीत मुलांसाठी पी सी विकत घ्या आणि वर दिलेल्या गोष्टी त्यांना करायला लावा. शेवटी काय तर ज्या सुट्टीत सर्वात जास्त मजा येते तीच सुट्टी खरी!