उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी अभ्यास विसरू नये म्हणून ४ उपाय

मुलांना उन्हाळ्याची सुट्टी फार आवडते! 60 दिवस धम्माल, मज्जा, मस्ती आणि मुख्य म्हणजे शाळा नाही! ही सुट्टी म्हणजे रोजच्या शाळेच्या आणि अभ्यासाच्या वेळापत्रकापासून मुक्ती असते. पण याचे परिणाम सुद्धा भोगायला लागतात. संशोधनाने असे सिद्ध केले आहे की काही मुलांना या मोठ्या सुट्टीचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यांना पुढील शैक्षणिक वर्षात पूर्वी केलेला अभ्यास लक्षात रहात नाही आणि परीक्षेत गुण देखिल कमी मिळतात. यालाच 'समर लर्निंग लॉस' असे म्हणतात.

 

'समर लर्निंग लॉस' ची काही लक्षणे पुढे दिली आहेत.

 

1. सुट्टी सुरू व्हायच्या आधी ज्या परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले असतात, त्याच परीक्षेत त्यांना सुट्टी नंतर कमी गुण मिळतात.

2. गणितातील सूत्रे विसरतात.

3. त्यांच्या वाचन कौशल्यांवर आणि स्पेलिंग बनवायच्या क्षमतेवर परिणाम होतो.

 

तर मग तुम्ही 'समर लर्निंग लॉस' ला कश्या प्रकारे प्रतिबंध करू शकाल?

1. गणितातील कौशल्यांचा विकास करणे

मुलांसाठी कितीही कंटाळवाणे असले तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत दररोज तीन ते चार गणिते जरी केली तरी तुमच्या पाल्याला गणिताचा विसर पडणार नाही. तुम्ही ऑनलाइन उपलब्ध असलेल्या साधनांचा आणि व्हिडिओज् चा वापर करून तुमच्या पाल्याला गणितातील संकल्पनांची उजळणी करण्यास देऊ शकता. असेच एक चॅनल आहे - Patrick JMT. यांचे गणित विषयीचे विनामुल्य व्हिडिओ हे यू-ट्यूब वरील अत्यंत प्रसिद्ध अश्या शैक्षणिक वाहिन्यांपैकी एक आहे. त्याचे 150,000 पेक्षा जास्त ग्राहक असल्याचा त्यांचा दावा आहे. 

 

2. व्याकरण शिकवा

तुमच्या पाल्याची भाषेवर असलेली पकड मजबूत रहावी आणि पुढील वर्षाचा अभ्यासक्रम सोपा जावा म्हणून सुट्टीत व्याकरणाची उजळणी घेत रहा. इंग्लिश ग्रामर 101 सारख्या वेबसाइट्स आणि व्हिडिओज् चा वापर करून तुमच्या पाल्याच्या व्याकरणाच्या संकल्पना मजबूत करता येतील. 

 

3. ब्लॉग्ज चा वापर करून रचनात्मक लिखाण करणे

तुमच्या पाल्याला ब्लॉग लिहिण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांच्या ब्लॉग वर ते प्रवासवर्णने आणि सुट्टीत यशस्वीपणे केलेल्या DIY बद्दलची माहिती देऊ शकतील. त्या व्यतिरिक्त त्यांना जे काही विषय आवडतील त्या विषयांवरील माहिती लिहू शकतील. असे करण्याने त्यांच्यातील सृजनात्मकता जागृत होईल, तसेच त्यांना ओघवत्या शब्दांत लिहिण्याची सवय होईल. 

 

4. तुमचा पाल्य ज्या विषयात मागे पडत असेल त्या विषयांवर जास्त भर द्या

असा एक तरी विषय नेहमीच असतो ज्यात तुमचा पाल्य मागे पडतो. त्या विषयाचा जास्त अभ्यास करून त्यात प्राविण्य मिळविण्यासाठी उन्हाळी सुट्टी हा तुम्हाला मिळालेला अतिशय चांगला वेळ असतो. डेल च्या साधनांव्यतिरिक्त एड्युराइट चे संवादात्मक पाठ हे देखिल तुम्हाला मदत करतात. त्या पाठांमुळे तुमच्या पाल्याला सर्वच विषयांमधील ज्ञान पक्के करण्याची संधी मिळते आणि सर्व विषयांचा नीट अभ्यास करून ते नविन शैक्षणिक वर्षाला सामोरे जायला तयार असतात.