शिक्षकांसाठी 5 विनामुल्य ऑनलाइन शैक्षणिक साधने

तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक मनोरंजक आणि संवादात्मक बनविण्याची इच्छा आहे ? तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक चांगल्या प्रकारे गुंतवून ठेवण्याची इच्छा आहे ? हे सर्व करण्यासाठी ऑनलाइन उपलब्ध असणारी शैक्षणिक साधने तुम्हाला मदत करू शकतात. व्हिडिओज्, स्लाइडशोज्, खेळ आणि संवादात्मक समुह क्रियाकलाप ही सर्व प्रमुख साधने आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांइतकेच तंत्रकुशल बनता तेव्हा वर्गात आश्चर्यकारक बदल घडून येताना दिसू लागतात. वर्गात कंप्युटरचा वापर केल्याने मुलांना 21 व्या शतकात भरारी घेण्यासाठी आवश्यक ती तांत्रिक कौशल्येच आत्मसात करता येतात असे नाही तर, मुले अभ्यासात अधिक रस घेतात आणि अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतात.

पुढे दिलेली 6 साधने तुमच्या विद्यार्थ्यांना वर्गात गुंतवून तर ठेवतीलच पण त्या बरोबरच संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यातही मदत करतील.

1. Edmodo

मुलांना एकत्र अभ्यास करायला आवडते. तसेच त्यांना डिजिटल जगात वावरायलाही फार आवडते. या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन एडमोडो ने शिक्षकांसाठी नियंत्रित असे सोशल मिडिया व्यासपीठ निर्माण केले आहे ज्याचा वापर करून शिक्षक मुलांना गृहपाठ ऑनलाइन देऊ शकतात आणि तो तपासून गुण देखिल देऊ शकतात. याचा फायदा म्हणजे मुले गृहपाठ करून तो वेळेवर तपासून घेण्यासाठी उत्सुक असतात. तसेच दुस-या दिवशी काय शिकविले जाणार आहे हे जाणून घ्यायची इच्छा देखिल दर्शवितात.

 

 

तुम्हाला तुमच्या शाळेचा संदर्भ देऊन फक्त साइन अप करावे लागते आणि मग एक स्टडी ग्रुप बनवावा लागतो. एकदा हे केले, की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना ग्रुप कोड सांगून याचा वापर करण्यास सुरूवात करू शकता. जेव्हा तुम्ही साइन अप करून तुमच्या वर्गाचा समुह बनविता तेव्हा ते व्यासपीठ कसे दिसते त्याचा स्क्रीन शॉट पुढे दिलेला आहे.

 2. Kahoot!

वर्गात विचारण्याच्या प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात मदत हवी आहे ? काहूत ! हे एक विनामुल्य अणि वापरण्यास सोपे असे ऑनलाइन साधन तुमच्या मदतीसाठी उपलब्ध आहे. याच्या मदतीने शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासण्यासाठी प्रश्नमंजुषा, सर्वेक्षण किंवा प्रश्नावली तयार करू शकतात. विद्यार्थी अनेक प्रकारच्या उपकरणांचा वापर करून त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. प्रश्नावल्या किंवा प्रश्नमंजुषा ज्यांना "काहूत" असे संबोधले जाते, त्यांची रचना वर्गात खेळसदृश्य वातावरणाची निर्मिती करण्याच्या दृष्टीने केलेली असते. सर्वांना एकत्रितपणे सहभागी करून घेण्यासाठी खेळ हे वर्गातील सामायिक पडद्यावर दाखविले जातात आणि खेळाडू त्यांच्या स्वतःच्या कंप्युटर वर प्रश्नांची उत्तरे देतात. वर्गात एक छान आनंदाचे वातावरण तयार होते. तुमची स्वतःची प्रश्नमंजुषा तयार करणे किती सोपे आहे ते पहा.

 3. Schoology

काही वेळेस वर्गात शिकविले गेलेले मुद्दे आणि शिकवायचे असलेले मुद्दे यांची नोंद ठेवणे कठीण असते अश्यावेळेस लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (LMS) म्हणजेच अभ्यास व्यवस्थापन प्रणालीचा वापर करावा लागतो.

स्कूलॉजी एक लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम आहे ज्यात अभ्यासक्रम, दिनदर्शिका आणि वर्गात शिकवायच्या मुद्द्यांची यादी इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव केलेला असतो. इतर गोष्टींसोबतच यात विद्यार्थी व त्यांनी मुल्यांकनात मिळविलेले गुण यांची देखिल नोंद असते. तुमच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास मनोरंजक बनविण्यासाठी तुम्ही यात मूल्यांकन, प्रश्नमंजुषा, मिडिया अल्बम आणि अन्य संसाधनांचा देखिल समावेश करू शकता. संवादात्मक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक उत्तम साधन आहे आणि याचे बेसिक पॅकेज विनामुल्य आहे. या साधनाद्वारे उपलब्ध असलेल्या असंख्य गोष्टींपैकी काही पुढे दिल्या आहेत.

4. Desmos

फळ्यावर आलेख (ग्राफ) काढण्यात तुमचा बराच वेळ वाया जाऊ शकतो. शाळेत प्रत्येक विषयासाठी ठराविक तास उपलब्ध करून दिलेले असल्यामुळे त्वरित आलेख काढून ते दर्शविणारे साधन मिळाल्यास त्याची खूपच मदत होते.

डेसमॉस हे एक असेच अत्यंत जलद गतीने चालणारे ऑनलाइन गणनयंत्र आहे जे कोणत्याही माहितीच्या आधारे त्वरित आलेख तयार करू शकते. यात वापरकर्त्याला नियंत्रण, प्रतिगमन करण्यासोबतच इतर गोष्टींमध्ये संपूर्ण डेटा सारण्यांचा वापर करण्याची मुभा असते. वर्गात अक्षीय भूमिती आणि रेखा समीकरणे यांसारख्या अवजड संकल्पना शिकवित असताना विद्यार्थ्यांना त्यात गुंतवून ठेवणे कधी कधी कठीण जाते. अश्यावेळेस डेसमॉस तुमची मदत करू शकते. या साधनाचा वापर करून तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असलेल्या विषयाची अद्ययावत माहिती देऊन त्यांना वर्गात लक्ष एकाग्र करण्यास मदत करू शकता.

5. Duolingo

विद्यार्थी भाषा शिकण्यासाठी फारसे उत्सुक नसतात याचे कारण म्हणजे भाषेचा अभ्यास करताना ते पटकन कंटाळतात. त्याच बरोबर भाषा शिकविण्यासाठी वापरली जाणारी पद्धत अतिशय रूक्ष असल्याने ते काम अधिकच आव्हानात्मक होते.

विद्यार्थ्यांसाठी अभ्यास अधिक मनोरंजक आणि संवादात्मक बनविण्यासाठी ड्यूलिंगो हे भाषा शिकविणारे ॲप आणि वेबसाइट आहे ज्यात वीस भाषांबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले गेले आहे.

पाठाचे खेळात रूपांतर करून शिकविल्यास ते अधिक परिणामकारक ठरते याचा पुरावा ड्यूलिंगो वापरल्याने मिळतो. बहुतांश साधने आणि ॲप्लिकेशन्स जिथे STEM (Science, Technology, Engineering and Mathematics) बद्दल माहिती देतात तेथे ड्यूलिंगोचे भाषा मनोरंजक बनविण्याचे धैर्य खरोखरच वाखाणण्यासारखे म्हणावे लागेल. सामान्यतः भाषा शिकविताना आधी अक्षरे, मग शब्द आणि नंतर वाक्ये शिकविली जातात. परंतु, ड्यूलिंगो ही पद्धत वापरत नाही. यात सुरूवातीला साधी वाक्ये शिकविली जातात आणि हळू हळू वाक्यांची क्लिष्टता वाढविली जाते.

ड्यूलिंगोचा वापर करून तुम्ही शाळांसाठी विविध भाषांचा अभ्यासक्रम देखिल तयार करू शकता. ते या प्रकारे करता येते.