प्रत्येक पालकाने हे ५ टेड टॉक्स पाहिले पाहिजे

 

आजच्या काळातील पालक हे डिजिटल युगात जन्मलेले पालक आहेत. नवीन युगातील हे पालक तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर अग्रेसर आहेतच शिवाय तंत्रज्ञान आणि त्याला अनुरूप पालकत्व आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील सुद्धा आहेत.

१) थोडेसे स्व-नियंत्रण तुम्हाला अत्यंत सक्षम करते - Joachim de Posada योअॅकिम द पोसादा

स्व-मदतीसाठी प्रेरक विचारांचे मार्गदर्शन करणारे प्रसिद्ध प्रशिक्षक योअॅकिम द पोसादा, घडत्या वयातील मुलांमध्ये आवश्यक असलेली स्वयंशिस्त आणि तिच्याबाबतचे यश यांच्यामधील संबंध सांगताना, एका भाषणात वरील महत्त्वाचे विधान करतात. त्यांच्या ह्या भाषणाला एक अफलातून विनोदी व्हिडिओची सुद्धा जोड दिलेली आहे. त्यामध्ये मुलांच्या भविष्यातील यशाचे भाकीत करण्यासाठी, मुलांनी मार्शमेलो खाण्याच्या संदर्भातला एक प्रयोग हमखास केला जातो.

२) धाडसी असणे चांगले असते - कॅरलीन पॉल

“तरूण मुलींनी आपला परीघ वाढवून आपल्या क्षमतांचा सर्वोच्च वापर करणे आवश्यक आहे’’, फायरफायटर (आगीशी लढणाऱ्या) कॅरलीन पॉल ह्यांच्या एका प्रेरणादायी भाषणात त्या असे म्हणतात. ह्या व्हिडिओमध्ये कॅरलीन पॉल ह्यांच्या अशाच काही गोष्टी आहेत. दुसऱ्या मुली विचारही करू शकणार नाहीत, असे धाडसी निर्णय त्यांनी स्वत:च्या सुरक्षित परीघाच्या बाहेर जाऊन कसे घेतले, याचे चित्रण म्हणजे ह्या गोष्टी आहेत.

३) डिजिटल युगाचा सर्वोत्तम उपयोग कसा करून घ्यावा - जॅक काँट

ह्या डिजिटल युगात जी मुले क्रिएटिव्ह म्हणजे कलात्मक क्षेत्रात करियर करू इच्छितात, अशा मुलांच्या चिंताग्रस्त आणि साशंक पालकांसाठी एक सुसंबद्ध आणि आशादायक असे हे, यू-ट्यूबर जॅक काँटचे व्याख्यान आहे. ह्या क्षेत्रात नियमितपणे पैसे कसे कमवता येतात इथपासून ते एखाद्या (कलाकार) व्यक्तीची खरी संपत्ती जाणून घेण्यापर्यंतचा आकर्षक प्रवास ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला असतो.

४) त्यांना त्यांच्या आवडीच्या कामात रमू द्या - स्कॉट डिन्समोअर

जे पालक आपल्या पाल्याला त्यांच्या भविष्याचा (करियरचा) मार्ग निश्चित करण्यासाठी मदत करतात, त्या सर्व पालकांनी उद्योजक स्कॉट डिन्समोअर यांचा हा व्हिडिओ पाहायलाच हवा. तुमच्यावर कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो, आणि नंतर त्यावर कसे काम करावे, याबद्दल संशोधन केल्यानंतर त्यातून जे शिकायला मिळाले, त्याविषयी ते सांगतात.

५) विज्ञानाच्या आधारे पालकत्व - हेलन पिअर्सन

गेली ७० वर्षे, काही ब्रिटीश शास्त्रज्ञ हजारो मुलांच्या जीवनाचा अभ्यास करत आहेत, की काही मुले निरोगी आणि आनंदी का असतात आणि काही मुलांना मात्र त्यासाठी संघर्ष का करावा लागतो? शास्त्रज्ञ हेलन पिअर्सन यांची ही भाषणे खूपच प्रभावी असतात कारण त्यातील निरीक्षणांना अनेक वर्षांच्या शास्त्रीय अभ्यासाचा आधार असतो.
पीसी टाईम हा फॅमिली टाईम असू शकतो का? आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हो, असू शकतो. कसा? प्रत्येकाला आवडतील अशा अॅक्टिव्हिटीज एकत्र करून. :)