सहज आकलन होण्यात अडचण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचे ५ मार्ग

 

 

आम्ही अध्यायनाचे उत्तम नियोजन करतो/ टीचिंग प्लॅन तयार करतो, अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होण्यासाठी योग्य नियोजन करतो, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख तपासण्यासाठी वेळोवेळी परीक्षा घेतो आणि तो पडताळून पाहतो. पण तरीही, काही कमतरता आहे का? एखाद्या सामान्य बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याने घववघवीत यश मिळवल्याचा आनंद काही औरच असेल, नाही का?

विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी पीसीच्या मदतीने तुम्ही या पाच युक्तयांचा वापर वर्गात करू शकता.

१) विद्यार्थ्यांच्या मनात काय चालले आहे ते ओळखायला शिका: विद्यार्थ्यांच्या मनात शिकण्याविषयी स्वत:चीच काहीतरी एक समजूत असते.

त्यांचा असा समज असतो की, जन्मत:च काही ठरावीक क्षमता आणि कौशल्ये आपल्याला मिळाली नाहीत. आणि त्यांना कुणी प्रेरणा दिली तरच आपण त्यावर मात करू शकतो. या समजुतीवर मात करण्याचा सर्वात उत्तम आणि महत्त्वाचा मार्ग म्हणजे त्यांचे कौतुक करा.

उदा- प्रत्येक आठवड्याला तुझ्या/ तुमच्या लेखी परीक्षेच्या कामगिरीमध्ये सुधारणा दिसतेय! अरे वा! वाचनाचा सराव चांगला चाललेला दिसतोय, तुझी चित्रकला फारच छान आहे. मुलांच्या अंगी असलेल्या क्षमतांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिल्यास त्यांना अध्ययनाची गोडी लागते आणि ती दीर्घ काळ टिकून राहते. शिवाय आत्तापेक्षा अधिकाधिक चांगली/सुधारित कामगिरी करून दाखवायला विद्यार्थी प्रवृत्त होतात.

२) मित्र/सवंगडी होऊन शिकवा (बडी मेण्टोरिंग प्रोग्राम): सदासर्वकाळ विद्यार्थ्यांसमोर शिक्षक म्हणून राहू नका, कधी त्यांच्या वयाचे होऊन त्यांचे सवंगडी व्हा. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास तर निर्माण होईलच शिवाय तुमच्यावरचा विश्वासही वाढेल आणि परिणामी त्यांची कामगिरी सुधारेल. हल्ली आधुनिक पद्धत वापरून शिक्षण देताना तुम्ही ऑनलाईन असूनही मुलांशी जोडलेले राहू शकता. एक ड्राइव्ह आणि ईमेल्सच्या माध्यमातून हे सहज  शक्य होते. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही डेटा स्टोअर करू शकता आणि शेअर देखील करू शकता.

३)  2*4 तंत्र वापरून बघा: साधे आणि प्रभावी. या तंत्राद्वारे विद्यार्थ्यांना ४ दिवस रोज २ मिनिटे त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यास संगितले जाते. त्यांना हव्या त्या विषयावर ते बोलू शकतात - त्यांच्या खास मित्र/मैत्रिणी पासून ते त्यांना कोणता विषय सर्वात जास्त आवडतो? अशा कोणत्याही विषयावर. या क्रियेमुळे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या रीतीने जाणून घेऊ शकाल, त्यांच्याशी जवळीक साधता येईल आणि अगदी त्यांना काही त्रास आहे का, अडचण आहे का, याविषयी सुद्धा जाणून घेता येईल.

४) सामूहिक कृती करण्यास प्रोत्साहित करा: विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांना शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रीय करण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी त्यांच्याकडून सामूहिक कृती करून घेणे हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. सामूहिक कृतीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी सहकार्य भावनेने वागतात, एकमेकांना मदत करतात आणि एकट्याने कृती करणार्&zwjया विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक प्रगती आणि आत्मविश्वास दिसून येतो. (The National Academies Press- https://www.nap.edu/read/5287/chapter/3)

५) प्रगतीचा मागोवा घ्या:मनुष्याला गुणांपेक्षा चुका काढण्याची अधिक सवय असते. सकारात्मक गोष्टींच्या आधी नकारात्मक गोष्टी शोधायचा प्रयत्न केला जातो. मात्र तुम्ही विद्यार्थ्यांना त्यांचे प्रगती पुस्तक दाखवताना त्यांच्या मनात सकारात्मकता ठसवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या कामगिरीमधला फरक त्यांना आकृत्या आणि एक्सेल शीट्सच्या मदतीने दाखवल्यास त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढू शकतो. 

प्रोत्साहन किंवा प्रेरणादायी शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांना खरी माया आणि सह-अनुभूतीचा प्रत्यय देतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:मध्ये सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते आणि शिक्षकांकडून ‘चांगला ते उत्तम’ अशी शाबासकी सुद्धा मिळवता येते.