शिक्षणाच्या नव्या युगाशी जुळवून घेणं

 

बदलत्या काळानुसार देशात शिक्षणपद्धतीचंही अद्ययावतीकरण होत आहे. अचानक, सर्वांनी डिजिटल वर्ग असलेली शिक्षणपद्धती स्वीकारली आहे, त्यात संगणकाच्या आधारे शिक्षण हे नव्या शिक्षणयुगाच्या केंद्रस्थानी आहे.

 

आमच्या ‘डेल फॉर एज्युकेशन’या अभियानांतर्गत आम्ही शिक्षकांना  त्यांच्या कौशल्यांचं अद्ययावतीकरण करता यावं आणि संगणाकाधारित शिक्षणाचा अंगीकार करता यावा म्हणून वेबिनार सुरु केले.

 

साधारण 75-90 मिनिटांत तुम्ही आकर्षक संकल्पना, प्रभावी ऑनलाईन शिक्षण, शैक्षणिक उद्दीष्टांची निश्चिती आणि प्राथमिकीकरण, शिक्षणपद्धतींची परिणामकारकता, मूल्यांकनाचा पुनर्विचार आणि ऑनलाईन सत्रादरम्यान काय टाळावं- याविषयी शिकू शकता.

 

आमच्या प्रशिक्षणाचे हे काही ठळक फायदे-

बदलांशी जुळवून घेण्यासाठी

  • तुम्ही वर्ग घेण्यापूर्वी ऑनलाईन माध्यमाविषयी जाणून घ्या. या माध्यामाच्या वैशिष्ट्यं आणि साधनांची ओळख करुन घ्या. वर्ग घेण्यापूर्वी चाचणी वर्ग घ्या.
  • वैयक्तिकता आणण्यासाठी तुमचा कॅमेरा सुरु करा. विद्यार्थ्यांना वर्गात उत्तरं देण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांच्या शंकांना उत्तरं द्या.
  • ज्या विद्यार्थ्यांना अखंडित इंटरनेट उपलब्ध नाही किंवा ज्यांच्याकडे वेळ नाही, त्यांच्यासाठी तयारी करा आणि प्रत्येक सत्र आधी रेकॉर्ड करा.

परस्पर-संवादपूर्ण पाठांसाठी

  • नेमकेपणासाठी धडा छोट्या भागांमध्ये विभाजित करा. विद्यार्थ्यांना व्हिडिओ आणि पीडीएफ यासारखी अभ्यास-सामग्री पुरवा.
  • विविध विषयांसाठी अद्ययावत माहिती असलेलं इ-लर्निंग वाचनालय तयार करा. विद्यार्थ्यांचं लक्ष गुंतवून ठेवण्यासाठी वेधक व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्सचा वापर करा.
  • परस्पर-संवादी गृहपाठ, प्रश्नमंजुषा आणि मतदान या द्वारे वर्गाला शिकवण्यात गुंतवा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घ्या.

तुमच्या संभाव्य समस्यांसाठी

  • काही विद्यार्थी श्राव्य माध्यामातून शिकतात, तर काही दृश्य माध्यमातून. सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यात गुंतवण्यासाठी तुमच्या शिकवण्याच्या प्रक्रियेत विविध प्रकारांचा वापर करा.
  • विद्यार्थाच्या संभाव्य शंकांचं निरसन करण्यासाठी आयत्या वेळी उद्भवू शकणाऱ्या तांत्रिक समस्यांविषयी माहिती करुन घ्या. त्यांना ऑनलाईन डॉक्युमेंटसचा खुला वापर करण्याची मुभा द्या.
  • ऑनलाईन शिक्षणातून येणाऱ्या एकटेपणावर उपाय म्हणून मुलांसाठी गट उपक्रम, गृहपाठ आणि परस्पर-संवादी शिक्षण सादरीकरण यांचं समन्वयन करा.

 

शिक्षक या नात्याने तुम्ही बदलत्या काळाशी जुळवून घ्यायला तयार राहिलं पाहिजे. स्वतःच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी आणि शिक्षणाच्या भवितव्याचा स्वीकार करण्यासाठी इथे

भेट द्या. (https://www.dellaarambh.com/webinars/)