सायबरबुलिंग बद्दल माहिती आणि त्याला कसे हाताळावे

निशांत हा बास्केटबॉल मध्ये त्याच्या पेक्षा मोठ्या असलेल्या मुलांपेक्षा जास्त पारंगत होता. अचानक एका दिवशी असे काहीतरी घडले की त्याची खेळण्याची इच्छाच संपली. 14 वर्षांचा हा मुलगा एकलकोंडा बनला आणि त्या गोष्टीचा त्याच्या खेळावर देखिल परिणाम होऊ लागला.

शेवटी एका दिवशी त्याने त्याच्या वडिलांना सांगितले की त्याच्या पेक्षा मोठी असलेली मुले ऑनलाइन त्याचे फोटो शेअर करून त्याच्या बद्दल अपमानजनक गोष्टी लिहून त्याला त्रास देत आहेत.

जर तुम्हाला अश्या कोणत्या व्यक्तीची माहिती असेल जे इंटरनेट चा वापर दूस-यांना घाबरविण्यासाठी किंवा त्यांचा अपमान करण्यासाठी करत असतील, तर ते सायबरबुली असू शकतील.

पारंपारिक दादागिरी मध्ये जसे समोरासमोर त्रास दिला जायचा किंवा त्रास देणारी व्यक्ती ताकदवान असायची, त्या सगळ्याची सायबरबुलिंग मध्ये गरज नसते. इंटरनेट कनेक्शन किंवा मोबाइल फोन असलेली कोणतीही व्यक्ती स्वतःची खरी ओळख न दाखवता दुस-या व्यक्तीला सायबरबुलिंग करू शकते.

सायबरबुलिंग ची पुढे दिलेली काही उदाहरणे तुम्हाला ओळखीची वाटतात का?

  1. सोशल मिडिया आऊटलेट्स वर नको ते फोटो किंवा मेसेजेस पोस्ट करणे.
  2. अपमानजनक टेक्स्ट मेसेजेस पाठविणे.
  3. दूस-या कोणाच्या तरी नावाने खोटे अकाऊंट तयार करणे.
  4. दूस-यांच्या पर्सनल कंप्यूटरवरील खाजगी फाइल्स किंवा फोल्डर्स पहाणे.

तर मग तुम्ही सायबरबुलिज् ना कसे हाताळाल?

  1. काही प्रतिक्रिया देऊ नका - जर कोणी तुम्हाला त्रासदेत असेल, तर नेहमी लक्षात ठेवा त्या व्यक्तीला तुमची प्रतिक्रिया पहायची असते. तुम्ही जी काही प्रतिक्रिया द्याल त्याने त्या व्यक्तीला जास्त हुरूप येतो. दादागिरी करणा-याला प्रोत्साहन कधीही देऊ नका.
  2. प्रत्युत्तर देऊ नका - प्रत्युत्तर देण्याने तुम्ही देखिल दादागिरी करणा-यांमध्ये सामिल होता आणि तुम्हाला त्रास देणा-याचे मनोबळ उंचावते. मग ती एक साखळीच तयार होते. ते होऊ देऊ नका.
  3. पुरावे जपून ठेवा - सायबरबुलिंग बद्दलची एक चांगली बातमी म्हणजे तुम्हाला त्रास देण्यासाठी वापरण्यात येणारेमेसेजेस सेव करून एखाद्या मदत करू शकणा-या व्यक्तीला दाखवता येतात. तुम्ही ते मेसेजेस नेहमी सेव करून ठेवा म्हणजे नंतर जर परिस्थिती बिघडली तर तुम्हाला मदत घेण्यासाठी त्यांचा फायदा होईल.
  4. एखाद्या विश्वासार्ह मोठ्या व्यक्तीशी बोला - तुमच्या पासकांना अशा गोष्टींची माहिती देणे नेहमीच चांगले असते. पण काही कारणाने जर ते शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या शाळेतील समुपदेशकाकडे जाऊ शकता. त्यांना अशा गोष्टींना हाताळण्याची सवय असते. तुम्हाला जर त्यांच्यासोबत बोलायची भिती वाटत असेल, तर शाळेत अनामिकपणे तो विषय काढता येतो का ते पहा.
  5. दादागिरी करणा-या व्यक्तीला ऑनलाइन ब्लॉक करा - जर तुम्हाला मेसेजेस, टेक्स्ट किंवा प्रोफाइल कमेंट च्या द्वारे त्रास दिला जात असेल, तर इंटरनेट वरील प्रायवसी सेटिंग्ज चा वापर करून त्या व्यक्तीला ब्लॉक करा. जर चॅट मधून त्रास दिला जात असेल, तर "चॅट रूम" मधून बाहेर पडा.
  6. तुमचा पी सी प्रोटेक्ट करा - एखादा चांगला अँटीव्हायरस वापरून तुमचे पासवर्ड्स सुरक्षित ठेवा. त्या अँटीव्हायरस च्या मदतीने तुम्ही सायबर थ्रेट्स पासून देखिल सुरक्षित राहू शकता. डेल पी सी मध्ये 15 महिन्यांचे McAfee चे अँटीव्हायरस सॉफ्टवेयर दिलेले असते ज्याने तुम्ही सुरक्षितपणे नेट वापरू शकता.

तुम्हाला अशा एखाद्या व्यक्तीची माहिती आहे का ज्याने सायबरबुलीची समस्या हाताळली आहे? #DellAarambh चा वापर करून ट्विट करा आणि आम्हाला त्या व्यक्तीची माहिती द्या.