या घोकंपट्टी विरोधदिनी पीसी च्या मदतीने अभ्यासाला मूर्त रूप द्या

 

एक शिक्षक म्हणून तुमच्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासाशी असलेले नाते बदलण्याचे सामर्थ्य असते. अभ्यास म्हणजे परीक्षेआधी करावी लागणारी गोष्ट अशी असलेली धारणा बदलून तुम्ही किंवा पालकांनी प्रयत्न न करताही विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने अभ्यास करावा असे प्रयत्न तुम्ही करायला हवेत.

ते करण्यात तुम्ही पीसी ची मदत घेऊ शकता. तुम्ही शिकवत असलेल्या गोष्टींना मूर्त स्वरूप कसे देऊ शकता ते पुढे दिले आहे :

1. वर्गात अनपेक्षिततेचे / विस्मयाचे वातावरण ठेवत जा

असे केल्याने तुमच्या विद्यार्थ्यांना केलेला अभ्यास परीक्षेनंतर देखिल दीर्घकाळ लक्षात राहील. उदाहरणार्थ - तुम्ही शिकवत असलेल्या धड्याशी संबंधित The Revolution सारखा एखादा शब्द अक्षरे उलटसुलट करून “het nuvreilovoi” असा लिहा. विद्यार्थ्यांना तो शब्द ओळखण्यास सांगा.

2. उदाहरणे दाखवा

याचा तुमच्या विद्यार्थ्यांवर कसा प्रभाव पडतो ते समजण्यासाठी तुम्हाला ते करून पहावे लागेल. तुम्ही सध्या शिकवत असलेल्या शेक्सपिअर च्या नाटकाचे चित्रपटात केलेले रूपांतर दाखविणे असो किंवा वनस्पतींचे जीवनचक्र समजाविण्यासाठी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करायला लावणे असो, उदाहरणातून अनेक गोष्टी शिकता येतात.

3. शिकविलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल गहन विचार करून दैनंदिन जीवनाशी संबंध जोडण्यासाठी तुमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या

हे करण्यासाठी, वर्गात शिकविण्यासाठी असलेल्या वेळातील थोडा वेळ काढून तुम्ही, विद्यार्थ्यांना एखादा मुद्दा द्या आणि त्याच्याबद्दल त्यांना पीसी वर माहिती शोधू द्या. त्या शोधलेल्या माहिती बद्दल मग विद्यार्थ्यांना वर्गात चर्चा करू द्या. असे केल्याने विद्यार्थी त्या संकल्पनेबद्दल खोलवर विचार करतील, त्याचा गोषवारा काढतील आणि विविध संकल्पनांमधील परस्पर संबंध शोधून काढतील.

4. गृहपाठ रोमांचकारक बनवा

पीसी वरील Drawisland सारख्या स्त्रोतांचा वापर करून तुम्ही कधी तुमच्या विद्यार्थ्यांना कार्टून्स बनण्यास सांगितले आहे का?
तुमच्या वर्गात जाणवणारे चैतन्य आणि होणारा अभ्यास यांची कल्पना करून पहा!

5. सराव प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी वर्गात वेळ द्या

ब-याचदा असे आढळून आले आहे की विद्यार्थी परीक्षेच्या आदल्या दिवशी सराव प्रश्नपत्रिका सोडवायला घेतात, आणि मग त्यांच्या मनात अनेक शंका निर्माण होतात. असे होण्याची शक्यता टाळण्यासाठी, तुम्ही नियमितपणे वर्गात सराव परीक्षा घेत रहा आणि त्यावरील तुमचे अभिप्राय विद्यार्थ्यांना विकीस्पेसेस क्लासरूम, गूगल क्लासरूम किंवा इमेल द्वारे कळवा. तसे केल्याने विद्यार्थी जेव्हा उजळणी करत असतील, तेव्हा त्यांना त्या अभिप्रायांचा संदर्भ घेता येईल.

विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट शिकविण्यामागचा उद्देश हा असतो की, त्यांनी ती संकल्पना समजून घ्यावी जेणेकरून परीक्षा झाल्यानंतर देखिल त्यांना ते दीर्घकाळपर्यंत लक्षात राहील. घोकंपट्टी करून जर मुलांनी अभ्यास केला तर हा उद्देश कधीच सफल होऊ शकत नाही. तुम्ही अभ्यासाच्या नविन पद्धतीची तुमच्या पाठ्ययोजनांपासून सुरूवात करू शकता आणि लवकरच तुम्हाला चांगले परिणाम दिसू लागतील. शिकविण्यासाठी शुभेच्छा!