BYOD : असा शैक्षणिक कल ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही

 

तुमच्या मुलांसाठी घरी पीसी आणणे हे त्यांना त्यांच्या आवडीचे खेळणे भेट म्हणून देण्यासारखेच आहे. फरक फक्त इतकाच आहे की ते खेळणे रोज नविन दिल्यासारखे आहे. केवळ एका बटणाच्या क्लिक ने तुमचा पाल्य खेळू शकतो, अभ्यास करू शकतो आणि नवनविन गोष्टी शोधू शकतो. आता तोच पीसी त्यांना शाळेत अभ्यासाला मिळाल्यानंतरचा त्यांचा उत्साह आणि आनंद कसा असेल याची कल्पना करून पहा.

BYOD किंवा ब्रिंग यॉर ओन डिवाइस (तुमचे स्वतःचे उपकरण आणा) हा जागतिक स्तरावर पसरत जाणारा नविन शैक्षणिक कल आहे. त्याबद्दल तुम्ही जे काही जाणून घेणे आवश्यक आहे, ते पुढे दिले आहे.

तर मग हे BYOD आहे तरी काय?

अलिकडेच केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार, सॉफ्टवेयरच्या जगातील मोठा खेळाडू, अडोब, ने असा निष्कर्ष काढला आहे की, जवळपास 85% शैक्षणिक संस्थांचा असा विश्वास आहे की मुलांना तंत्रज्ञान आणि शिक्षण यांचा समतोल असलेले वातावरण पुरविणे गरजेचे असते. सर्व वयोगटातील मुलांच्या दैनंदिन अभ्यासात तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी BYOD चा वापर करणे गरजेचे आहे. [1]

एकदा का इंटरनेट ॲक्सेस आणि पुरेसे चार्जिंग पॉइंट्स यांसारख्या पायाभूत सुविधा तयार झाल्या की मुलांना फक्त त्यांचे पीसी शाळेत नेण्याचेच काम शिल्लक रहाते.

ते तुमच्या मुलांसाठी कसे फायदेशीर आहे?

शिक्षणासाठी कंप्युटरचा वापर करून त्याचा फायदा होण्यासाठी मुलांना वयाची काही मर्यादा नाही. मुलांकडे जर वर्गात देखिल अभ्यासासाठी त्यांचा स्वतःचा पीसी असेल, तर तोच फायदा कित्येक पटींनी वाढतो. पीसीचा नियमित वापर करत राहिल्याने, मुलांना त्यांच्या पीसीच्या कार्यपद्धतीची चांगली ओळख होते त्यामुळे शाळेत नविन तंत्रज्ञान शिण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम देखिल वाचतात. तोच वाचलेला वेळ त्यांना त्यांच्या मूल्यांकनांसाठी वापरता येतो. त्याचबरोबर मुलांचा स्वतःचा पीसी असल्याने त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण होते आणि ती अभ्यासात जास्त रूची घेऊ लागतात. जर्नल मध्ये (नियतकालीकात) BYOD ला, "मुलांनी स्वतःचे शिक्षण स्वतःच्या हातात घेण्याचा मार्ग" असे म्हंटले आहे. हे एक असे कौशल्य आहे जे भविष्यात त्यांना त्यांची कारकीर्द घडविताना फार उपयोगी पडणार आहे. [2]

भविष्यात काय दडले आहे?

आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करून घेणे आणि होणा-या बदलांचा लवकर स्विकार करणे हे भविष्यात फार महत्वाचे ठरणार आहे. म्हणूनच आत्ताच्या मुलांसाठी त्याची शक्य तितक्या लवकर सुरूवात करणे उपयुक्त ठरेल. शाळेतील आयटी खोल्या या एक चांगली सुरूवात आहेत आणि भारतातील बहुसंख्य शाळांमध्ये आढळून येत आहेत. त्याची पुढची पायरी म्हणजे, मुलांना शाळेत आणि घरी दोन्ही ठिकाणी वापरण्यासाठी त्यांचा स्वतःचा पीसी उपलब्ध असणे. त्याचा फायदा म्हणून मुले केवळ पाठांतर न करता संकल्पना नीट समजून घेण्यास उत्सुक असतील.