अंमलबजावणीतली आव्हानं आणि त्यातून पुढे जाणं

आरंभच्या माध्यमातून आम्ही सुमारे 1.5 लाख विद्यार्थांपर्यंत पोहचलो आहोत आणि 70 शहरांमधल्या 5,000 शाळांमधून 1,00,000 शिक्षकांना प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र देण्याचं आमचं उद्दीष्ट आहे.हे आम्ही आमच्या आजवरच्या प्रवासात मिळवलेले विजय आणि स्वीकारलेली आव्हानं आहेत.

शिक्षकांचा प्रशिक्षणाकडे सकारात्मक कल असतो हे कांतार अहवालाच्या निरीक्षणांमधून स्पष्ट झालं आहे. ते सप्ताहांताला दिलेलं प्रशिक्षण, सामग्री, प्रशिक्षक आणि प्रशिक्षण पद्धतीविषयी समाधानी आहेत.

विद्यार्थ्यांनी संगणक-आधारित गृहपाठाविषयी विचारणा करायला सुरुवात केली आहे, त्याचप्रमाणे स्मार्ट क्लासमध्ये 100% उपस्थिती असते, असा शिक्षकांना विश्वास वाटतो. ज्या विद्यार्थ्यांच्या घरी संगणक नाहीत, त्यांनी गृहपाठ आणि गट-स्वाध्याय शाळेतल्या संगणकावर पूर्ण केले.

हा प्रवास अर्थातच आव्हानांविना नव्हता. काही पालकांना लॅपटॉप/संगणक परवडणारे नव्हते किंवा इंटरनेटच्या समस्या होत्या. मुलं संगणकावर जास्त वेळ घालवत असल्यामुळे संगणक-आधारित गृहपाठ देणं अवघड होतं.

याउलट, या उपक्रमाचा कालावधी आणि वारंवारता वाढावी अशी शिक्षकांची इच्छा होती आणि त्यांची कार्यक्षमता वाढवणारी अॅप्लिकेशन्स/साधनं शिकायला ते उत्सुक होते.

 

 

सहभागींना काय हवंय?

84% शिक्षक ऑनलाईन प्रशिक्षणासाठी तयार आहेत. हे प्रमाण वयानुसार कमी होतं जातं. बदलत्या काळाची पावलं ओळखून मुख्याध्यापकही ऑनलाईन प्रशिक्षणात रस घेत आहेत. ऑफलाईन प्रशिक्षणाला  थेट प्रशिक्षण आणि शंका निरसनासाठी प्राधन्य दिलं जात आहे.

 

 

पुढची दिशा

आम्ही बदलांची अंमलबजावणी तीन टप्प्यांत करणार आहोत-

  • पुनःप्रशिक्षण-

संगणक वापरातलं नैपुण्य आणि त्याचा वापर वयानुसार कमी होतो, त्यामुळे आम्ही ज्येष्ठ शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण सत्रांचं आयोजन करणार आहोत.

  • परिसंवाद आयोजित करणं-

पालकांना संगणक आधारित शिक्षणाचं महत्व पटवून देण्यासाठी शिक्षक आणि व्यवस्थापन जागरुकता उपक्रमांना हातभार लावू शकतात.

  • सूचनांची अंमलबजावणी-

84% शिक्षक ऑनलाईन प्रशिक्षणासाठी तयार असल्यामुळे आणि त्यातून घडणारा आकलनात्मक आणि वर्तनात्मक बदल त्यांना आवडत असल्यामुळे आम्ही ते सुरु ठेवणार आहोत.

येणाऱ्या काळात भारताची जनता अधिक संगणक-स्नेही व्हावी यासाठी बदल घडवून, अधिक विद्यार्थांपर्यंत पोहचून आणि अधिक शिक्षकांना प्रशिक्षित करणं हे आमचं उद्दीष्ट आहे.