डेल आरंभ: का,काय आणि कसं- आजवरचा प्रवास

 

तो दिवस होता 6 जून 2016. याच दिवशी आम्ही भारतभर डेल आरंभची सुरुवात केली. देशभरातल्या शहरांमधून संगणक प्रशिक्षण देणं हा त्यामागचा उद्देश होता. विशेषतः मेरठ, रांची आणि नाशिकसारखी टियर 2 आणि टियर 3 शहरं या अभियानाच्या केंद्रस्थानी होती.

2016 मध्ये भारतातली टेलीडेन्सिटी वाढून 50.63% टक्क्यापर्यंत पोहचली होती. 1 तरीही, ग्रामीण भागातल्या लोकांच्या मनात अद्याप तंत्रज्ञानाविषयी काहीशी धास्ती होती. नेमक्या याच वेळी आम्ही पुढे आलो.

त्यासाठी आम्हाला पठडीबद्ध शिक्षणापासून फारकत घेऊन अधिक गुंतवणाऱ्या आणि परिणामकारक शिक्षणपद्धतींकडे वळावं लागलं. आम्ही प्रशिक्षकांच्या समूहाच्या मदतीने एक जाळं निर्माण केलं आणि त्याद्वारे माता, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना खेळकर, रंजक आणि थेट पद्धतीने संगणक-कौशल्याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.

तर मग आमचा प्रवास होता तरी कसा?

विद्यार्थी, शिक्षक आणि मातांना संगणक वापरण्यासाठी आवश्यक ते ज्ञान देऊन त्यांचं सबलीकरण करण्यावर, शिकत असताना त्यांचं कौशल्य विकसित करत जाण्यावर आमच्या प्रवासाचा भर होता. शिक्षकांसाठीच्या प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही सेंटर फॉर टीचर अक्रेडिटेशन (CENTA)शी भागीदारी केली आणि शिक्षकांसाठी मजेदार आणि स्पर्धात्मक अशा ऑलिम्पियाडचंही आयोजन केलं.

वर्गात आणि वर्गाबाहेर शिक्षकांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यांच्यावर कल्पक उपाय शोधण्यासाठी आम्ही  पॉलिसी हॅकच्या माध्यमातून शिक्षकांना आवाहन केलं, त्याचबरोबर वर्गात तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान शिक्षकांना देता यावं यासाठी आम्ही टाटा क्लासएजशी भागीदारी करुन डिजिटल प्रशिक्षण शाळांपर्यंत पोहचवलं.

तर मग भविष्य कसं असेल?

तीन वर्षांनंतर आम्ही युनेस्कोच्या महात्मा गांधी इन्स्टिटूट ऑफ एज्युकेशन फॉर पीस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट (UNESCO-MGIEP)शी भागीदारी केली. त्यात युनेस्को-एमजीआयईपीने विकसित केलेल्या प्रशिक्षण सामग्रीच्या आधारे शिक्षकांना फ्रेमरस्पेस प्लॅटफॉर्मचं प्रशिक्षण दिलं जाईल.ही तीन दिवसांची कार्यशाळा आहे आणि त्यानंतर 200 तासांचं ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

आणि एवढंच नाही...

 

4,507 लाभार्थी शाळा, 83,501 प्रशिक्षित आणि प्रमाणित शिक्षक आणि 1,13,708  प्रशिक्षित मातांच्या माध्यमातून या प्रशिक्षणाने आपल्या देशभरात सर्वगामी परिणाम केला आहे. भविष्याकडे पाहताना असं दिसतं की 2020 हे आरंभसाठी निर्णायक वर्ष असेल, कारण हे प्रशिक्षित शिक्षक आपलं प्रशिक्षण अधिक लोकांना देतील आणि त्यातून सुसज्ज आणि केवळ शिक्षणातच नव्हे, तर आयुष्यातही आत्मविश्वासाने संगणक वापरणाऱ्या लोकांची साखळी तयार होत जाईल.