#डिजिमॉम्स – हे तुमच्यासाठी मार्गदर्शक आहे!

 

तुम्हीच तुमच्या बाळासाठी सुपरवुमन आणि आदर्श व्यक्तिमत्व हे सर्व एकितपणे असता. त्याचप्रमाणे तुम्ही त्यांच्या #डिजिमॉम सुद्धा असता. मग, ते सर्व तुम्ही कसे कराल?

 

1. प्रेमळपणे वागण्याचा नेहमीच फायदा होतो

तुमचा प्रेमळपणाच तुम्हाला घडवतो!

सकाळी उठल्यापासून ते तुमच्या बाळाला झोपवेपर्यंतचा प्रत्येक क्षण तुमच्या प्रेमळपणाची कसोटी पहाणारा असतो. तुमची मुले अनेक मागण्या करणार हे तर गृहीतच धरून ठेवा आणि त्यातही तंत्रज्ञानाशी संबंधित त्यांच्या मागण्या असतील त्या तर फारच आव्हानात्मक असणार आहेत. तुमच्या मुलांना त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते याची खात्री करून देण्यासाठी दिवसातील थोडा वेळ तंत्रज्ञानासाठी नियोजित करून ठेवा. यात पीसी आणि मोबाइल दोन्हींचा समावेश करा. त्या नियोजित वेळेला तंत्रज्ञानाचा वापर करायला मिळणार हे एकदा तुमच्या मुलांना समजले की मग ते काही अवास्तव मागण्या करणार नाहीत.

 

2. संयम खूप महत्वाचा असतो – तो वाढवा

तुमच्या मुलांच्या शिक्षणाठी पीसी वरून जेव्हा योग्य तो स्त्रोत निवडण्याची वेळ येते तेव्हा संयमाची सर्वात जास्त गरज असते. तुमच्या मुलांना कोणतीही वेबसाइट वापरायला देण्याआधी तुम्ही स्वतः ती नीट तपासून पहा. तुमच्या मुलांनी पाहू नये असा काही मजकूर त्या वेबसाइट वर नाही ना याची खात्री करून घ्या. सावधगिरी बाळगण्यासारखी दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खोट्या बातम्या आणि माहिती. त्यासाठी तुमच्या मुलांना फॅक्ट फ्रॉम फिक्शन (खऱ्या खोट्याची शहानिशा) कसे करायचे ते शिकवा. 

 

3. लक्ष द्या

तुमच्या मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. एक तर तुम्ही त्यांची उत्तरे द्या किंवा ती इंटरनेटवरून मिळवतील. इंटरनेट त्यांना पटकन उत्तर देईल पण ते कदाचित बरोबर नसेल. यावरील सोपा उपाय म्हणजे, तुमच्या मुलांचे बोलणे लक्ष देऊन ऐका आणि त्यांना नीट उत्तरे द्या.

प्रत्येक आई कडे सर्व कामांची यादी तयार असते. त्याप्रमाणेच डिजिटल पॅरेंटिंग साठी सुद्धा एक यादी तयार करा. तुमच्या त्या  चेकलिस्ट (यादी) मधील सर्व गोष्टी शिका आणि बघा थोड्याच दिवसात तुम्ही डिजिटल पॅरेंटिंग मध्ये मातब्बर झालेल्या असाल. इथे महत्वाची गोष्ट असते कामांमधून मोकळा वेळ काढणे आणि पीसी मुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला काय काय फायदा होऊ शकतो ते शिकणे. डिजिटल पॅरेंटिंग साठी शुभेच्छा!