गुगल सेफ-सर्चविषयी तुम्हाला माहित हव्या, सर्व गोष्टी

 

आपण राहतो त्या इंटरनेट युगात कोणतीही माहिती (काही बटणे दाबली असता) जणू आपल्या अगदी बोटावर आहे. म्हणूनच इंटरनेट हा, जसा तुमच्या मुलांना माहिती मिळवून देणारा एक समृद्ध स्रोत किंवा मार्ग आहे त्याचप्रमाणे तो माहितीचे एक भयंकर खोल विवर किंवा दरीही आहे, जी तुमच्या तरुण, वयात येणाऱ्या आणि सहज प्रभाव पडू शकेल अशा वयात असणाऱ्या मुलांसाठी असुरक्षित किंवा धोकादायक आहे. डिजिटल यंत्रणेशी ओळख असणारे पालक म्हणून, तुम्ही त्यांच्या ऑनलाईन सर्च वर काळजीपूर्वक लक्ष किंवा देखरेख ठेवा जेणेकरून ते ऑनलाईन असताना इंटरनेटचा सुरक्षित आणि योग्य वापर करतील. ह्या सगळ्याची खबरदारी एका साध्या आणि प्रभावी टूलच्या मदतीने घेतली जाऊ शकते, ते म्हणजे गुगल सेफ-सर्च.

गुगल हे इंटरनेटचे सर्वात प्रभावी आणि अग्रगण्य सर्च इंजिन आहे, अयोग्य साईट्स पाहण्यासाठी प्रतिबंध घातलेला नसल्यास केवळ एका बटणावर टॅप करून आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकतो.

 

पण आधी पाहूया, ते (गुगल सेफ-सर्च) काय आहे?

गूगल हे सर्वांचे आवडते आणि मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. आपल्या बहुतेक सर्व उपकरणांमध्ये (डिव्हाईस) आपण तेच वापरतो. सामान्यत: आपल्या मुलांच्या सर्च रिझल्ट्सवर पालकांचे लक्ष आणि नियंत्रण असते मात्र काही (गोष्टींचा) सर्च च्या बाबतीत अयोग्य तपशिल (कंटेंट) दिसतो. सेफ-सर्च मुळे सर्च केलेल्या कंटेंटमधून अशा प्रकारचे कंटेंट (फोटोज, चित्रे आणि व्हिडिओज) तपासून (फिल्टर करून) स्क्रीनवर दिसतात म्हणजेच अयोग्य कंटेंट संबंधीची माहिती स्क्रीनवर दिसण्यास आळा/प्रतिबंध घातला जातो. आणि याच पद्धतीने पालकांना त्यांचे नियंत्रण राखण्यास गुगल मदत करते. 

 

गुगल सेफ-सर्च कसा सेट करावा?

तुमच्या वेब ब्राउजर्सवर सेफ-सर्च कार्यान्वित (एक्टीवेट) करण्यासाठी, गुगल सर्च सेटिंग पेज वर जा: google.com/preferences

 

  • “Turn on SafeSearch” हा बॉक्स चेक करा किंवा तपासा.

  • त्याच्या शेजारी असलेल्या “Lock SafeSearch.” या निळ्या अक्षरांवर क्लिक करा.

  • तुम्ही जर तुमच्या जी-मेल अकाउंट मध्ये आधीच लॉग-इन केलेले नसेल तर, सेफ-सर्च सेटिंग लॉक करण्याआधी (ब्राऊज करण्याआधी एखाद्या व्यक्तीला सेफ-सर्च पूर्णपणे बंद करण्यास प्रतिकार करता यावा म्हणून) तुम्ही लॉग-इन करणे गरजेचे आहे.

  • तसेच तुम्हाला तुमची ब्राऊजर सेटिंग्ज “always accept cookies’’ अशाप्रकारे बदलावी लागतील. (हे कसे करायचे याची खात्री नसल्यास गुगल तुमच्या मदतीसाठी एक लिंक देते.)

  • हे झाल्यावर, “Lock SafeSearch” ह्या बटणावर क्लिक करा.

 

आता सेफ-सर्च कसे एक्टीवेट करायचे हे तुम्हाला समजले आहे, आता तुम्ही निश्चिंत व्हा आणि तुमच्या मुलांकडे positive digital footprint. (पॉझिटिव्ह डिजिटल फूटप्रिंट) असल्याची खात्री करून घ्या.