परीक्षेचा तणाव : तुमच्या मुलांना परीक्षेच्या तणावाचा सामना करण्यात मदत करा

 

आपल्याला सर्वांनाच माहित आहे की परीक्षा म्हंटली की तणाव निर्माण होतोच. मुले जसजशी मोठी होतात तशी त्यांना त्या तणावाची जास्त जाणीव होऊ लागते. याचा परिणाम म्हणून मुले त्यांची उर्जा अभ्यासापेक्षा तणावामध्येच जास्त खर्च करू लागतात. परंतु आनंदाची गोष्ट म्हणजे, पुढील गोष्टींचे पालन करून तुम्ही तुमच्या मुलांची मदत करू शकता -

1. नियोजन करणे

एकदा का तुम्हाला परीक्षेचे वेळापत्रक मिळाले, की मुलांच्या शिकविण्या, खेळाचा वेळ इत्यादी सर्व लक्षात घेऊन गूगल कॅलेंडर आणि असाना सारख्या गोष्टींच्या मदतीने घरी वास्तववादी वेळापत्रक तयार करा. अभ्यासाबरोबरच नियमितपणे मनोरंजनासाठी मोकळा वेळ दिल्यास तुमची मुले त्या वेळापत्रकाचे आनंदाने पालन करतील.

2. तुमच्या मुलांसाठी काय उपयुक्त आहे ते शोधून काढा

पीसी असल्यामुळे, परीक्षेच्या आधी उजळणीसाठी केवळ पुस्तकांवरच अवलंबून रहावे लागत नाही. अभ्यास करत असलेल्या विषयाचे सखोल ज्ञान मिळविण्यासाठी, यू ट्यूब एज्युकेशन वरील व्हिडिओज्, एज्युकेशन वर्ल्ड मधील वर्कशीट्स, वाचनासाठी गूगल स्कॉलर इत्यादी अनेक मार्ग आहेत. तुमच्या मुलांना जो मार्ग सोपा वाटेल त्याचा वापर करून अभ्यास करता येईल.

3. मदत करावी, पण जास्त नाही

तुमच्या मुलांना, संकटात असताना मानसिक आधार देण्यासाठी नेहमीच तत्पर रहा. परंतु, त्यांना ज्या समस्या असतील, त्यांचे उपाय शोधण्याचा किमान दोन ते तीन वेळा त्यांनी प्रयत्न केल्या नंतरच तुम्ही ती समस्या सोडविण्यास मदत करा. तसे केल्याने त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होईल आणि स्वतःच्या समस्या स्वतः सोडविण्याची सवय लागल्याने भविष्यात देखिल त्यांना त्याचा उपयोग होईल.

4. खेळण्यासाठी वेळ देण्यास विसरू नका

अनेक पालकांचा असा समज असतो की, केवळ परीक्षा सपल्यानंतरच मुलांना खेळण्यासाठी मोकळा वेळ दिला पाहिजे. परंतु अभ्यासाच्या मध्ये जर नियोजन करून ठराविक वेळ मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी किंवा पीसी वर Sporcle वरील खेळांसाठी दिला, तर मुलांना परत अभ्यासाला बसल्यावर अभ्यासात जास्त काळ लक्ष एकाग्र करणे सोपे जाते. असे करताना खेळण्याचा वेळ अर्धा तास किंवा त्यापेक्षा कमी असेल याकडे लक्ष ठेवा म्हणजे मुलांना परत अभ्यासाला बसणे सोपे जाईल.

5. अंतिम निकालाबद्दल अती जास्त विचार करणे टाळा

परीक्षा संपल्यानंतर त्या परीक्षेत आपल्या पाल्याला किती गुण मिळतील हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रश्नपत्रिकेचे परत परत विश्लेषण करण्याची सवय पालकांना सामान्यतः असते. परंतु तसे करून अंदाजे गुण समजून घेतल्यामुळे तुमची मुले पुढल्या परीक्षेला जाताना अतिआत्मविश्वासाने किंवा अत्यंत माउमेद होऊन जाण्याची शक्यता असते.

तुमच्या मुलांच्या मनात परीक्षेची भीती नाही हे जाणून घेण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे, त्यांना कशाने प्रेरणा मिळते हे समजून घेणे आणि त्यांना प्रेरणा मिळत रहावी या दृष्टीने पीसी चा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे.