शाळा परत सुरू होताना शिक्षकांसाठी महत्वाच्या अश्या पाच गोष्टी

 

 

नविन शैक्षणिक वर्षाची सुरूवात विद्यार्थ्यांसाठी जितकी तणावपूर्ण असते तितकीच शिक्षकांसाठी देखील दुःसह असू शकते. अत्यंत धावपळीच्या असलेल्या या दिवसांबद्दल, तपासण्याच्या प्रश्नपत्रिकांबद्दल आणि शिकविण्याच्या धड्यांबद्दल जरी तुम्ही फार काही करू शकत नसलात, तरी पुढे दिलेल्या गोष्टींचे पालन केल्यास हे दिवस तुम्हाला नक्कीच सुसह्य होतील.

1. प्लानर (नियोजक)

अभ्यासक्रम, मिटींग्ज (भेटी) आणि ठरविलेल्या वेळा यांचा माग ठेवण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला एका चांगल्या नियोजकाची गरज असते. पुढे येणा-या आठवडा किंवा महिन्यासाठी तुम्ही नीट तयार आहात याची निश्चिती करून घेण्यासाठी ऑनलाइन विनामूल्य उपलब्ध असलेल्या डेव्यूअर सारख्या प्लानर चा वापर करून पहा. पीसी वरील साधनांचा वापर केल्यास तुम्हाला तुमच्या शाळेतील इतर शिक्षक आणि प्रशासकांच्या सहयोगाने काम करण्याचा विकल्प देखिल उपलब्ध असतो.

2. स्टेशनरी (शालेय साहित्य)

लाल शाईचे पेन, पिवळे हायलाइटर, खडू, व्हाइटबोर्ड मार्कर आणि स्टिकी नोट्स यांसारख्या काही मूलभूत गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तसेच तुम्हाला शिकविण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी व्यवस्थित रचून ठेवण्यासाठी त्यांच्यावर सफेद रंगाचे लेबल्स लावून तुम्ही ठेवू शकता.

3. टिकाऊ आणि मोठी बॅकपॅक

तुमच्या धावपळीच्या जीवनशैली साठी तुमच्याकडे एक टिकाऊ आणि भरपूर जागा असलेली बॅकपॅक असणे अत्यंत आवश्यक असते. त्यात तुम्ही तुमचा लॅपटॉप, कागद, जेवण, खाऊ, शालेय साहित्य आणि रोज लागणा-या इतर वस्तू ठेवू शकता. म्हणूनच आठवणीने एक बॅकपॅक घ्या.

4. पेनड्राइव

जेव्हा तुम्ही एका वर्गातून दूस-या वर्गात जात असता, किंवा दूस-या दिवशी वर्गात शिकविण्यासाठी घरी प्रेझेंटेशन्स किंवा असाइनमेंट्स तयार करता तेव्हा पेनड्राइव्ज चा चांगला उपयोग होतो. पेनड्राइव तुमच्या बॅकपॅकमध्ये सहज राहू शकते आणि तुम्हाला जेव्हा गरज असेल, तेव्हा तुमच्या शिकविण्याच्या धड्यांचे सर्व स्त्रोत पेनड्राइव मुळे तुम्हाला सहज उपलब्ध असतात.

5. पोर्टेबल डेस्क ऑर्गनाइजर (सहजतेने सोबत घेऊन जाता येण्यासारखा मेज संयोजक)

सुनियोजित मेज हे सुनियोजित मनाचे लक्षण मानले जाते. वर्गातील मुलांना सांभाळणे हेच खूप मोठे काम असते, त्यात भर म्हणून अस्ताव्यस्त पसरलेल्या मेजावर वस्तू शोधण्यासाठी तुमची उर्जा आणि वेळ वाया घालवू नका. एक चांगला नियोजक तुम्हाला लागणा-या शैक्षणिक साहित्य, पेन ड्राइव, मोबाईल फोन, चार्जर सारख्या सर्व गोष्टी तुम्हाला दिसतील अश्या जागी नीट रचून ठेवतो.

काही महत्वाच्या गोष्टी हाताळून आपण अर्धे काम केले आहे. आता आपला खूपसा वेळ आणि संयम खर्ची करणारे दूसरे काम हाताळूया. ते काम म्हणजे धड्यांच्या योजना तयार करणे. काही सूचना, युक्त्या आणि साधनांचा वापर करून आम्ही धड्यांच्या योजनेसाठी पाच मुद्द्यांची यादी बनवली आहे. जिचा वापर केल्यास तुम्ही नक्कीच सफल व्हाल. शिकविण्यासाठी शुभेच्छा!