पाच आइसब्रेकर्स जे तुम्ही वर्गात वापरून पाहिले पाहिजेत

 

सुट्टी संपून शाळा सुरू झाल्यावर जगभरातील शिक्षकांना एका समान समस्येला सामोरे जावे लागते, ती म्हणजे विद्यार्थ्यांचे लक्ष वर्गात गुंतवून ठेवणे. विद्यार्थ्यांना वर्गात गुंतवणे, जे चालले आहे त्यात त्यांना समाविष्ट करून घेणे आणि त्यांना तणावमुक्त करणे यासाठी वर्गात आइस-ब्रेकिंग सत्र घेणे महत्वाचे असते.

ही समस्या कशी सोडवावी हाच मोठा प्रश्न असतो. पुढे दिलेल्या काही उपायांमुळे तुम्हाला मदत मिळेल!

 

तुमचा अवतार तयार करा

विद्यार्थ्यांना त्यांचा अवतार तयार करून तो संपूर्ण वर्गाला दाखवण्यास सांगा. जो अवतार दाखवला जाईल, त्याला इतर मुलांनी ओळखण्याचा प्रयत्न करावा. डॉपलमी टूल मुळे तुमच्या विद्यार्थ्यांना त्यांचा अवतार विनामुल्य तयार करता येईल. यामुळे तुमचे विद्यार्थी गुंतून तर रहातीलच पण त्याचबरोबर त्यांना एकमेकांबद्दल बऱ्याचश्या गोष्टी सुद्धा कळतील.

 

क्लासरूम ब्लॉग

एक क्लासरूम ब्लॉग तयार करा आणि त्यावर विद्यार्थ्यांना त्यांची स्वतःची ओळख करून देणाऱ्या छोट्या छोट्या पोस्ट लिहायला सांगा. किडब्लॉग टूल हे वापरण्यासाठी सोयिस्कर असून ते विद्यार्थ्यांना गुंतवून देखिल ठेवेल. त्याचप्रमाणे सगळ्या पोस्ट वाचल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्यामधील काय काय सारखेपणा आहे ते समजेल.

 

सेल्फ पोट्रेट

 स्केचपॅड च्या मदतीने विद्यार्थ्यांना विनामुल्य स्वतःचे चित्र काढण्यास सांगा. कल्पकतेने स्वतःचे चित्र काढून वर्गात ते दाखवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्यासारखाच विचार करणारे मित्र सुद्धा समजून येतील.

 

कॉमिक्स वापरा  

मेकबिलिफ हे एक असे टूल आहे जे तुम्हाला विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी कॉमिक्स बनवायला मदत करते. विद्यार्थ्यांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी आणि मजा करण्यासाठी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी यात तयार करता येतात. हे विनामुल्य आहे आणि वापरायला सोपे सुद्धा आहे.

 

ह्यूमन बिंगो

ह्यूमन बिंगो मुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यासारखी आवड, छंद, कौशल्ये असणाऱ्या इतर विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास मदत मिळेल त्याचा फायदा म्हणजे त्यांना त्यांच्या वर्गातील मुलांबरोबर भरपूर प्रत्यक्ष संवाद साधता येईल.

 

आता विद्यार्थ्यांचे लक्ष तुम्ही आकर्षित केलेले आहे आणि आइस-ब्रेकिंग सेशन मुळे विद्यार्थी वर्गात रूळले आहेत. त्यांना असाइनमेंटमध्ये गुंतवणे सुद्धा महत्वाचे आहे. तुमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक असाइनमेंट मनोरंजक कशी बनवायची ते शोधून काढा.