तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्यातील पाच महत्वाचे नियम

 

तंत्रज्ञानाने शिक्षणपद्धतीत अमूलाग्र बदल घडवून आणला आहे. काही वर्षांपर्यंत शिक्षणासाठी पीसी चा वापर ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती आणि आता मात्र विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक शिक्षकाच्या शिकवण्याचा पीसी हा अविभाज्य भाग बनला आहे.

आता महत्वाचा मुद्दा असा आहे की वर्गात शिकवताना तंत्रज्ञानाला सोपे करून कसे वापरावे - त्यासाठी पुढील माहिती वाचा

 

नियम 1 : संशोधनाच्या कलेत प्राविण्य मिळवा

हे करणे खूप कठीण आहे पण एकदा का तुम्ही त्यात पारंगत झालात की मग तुम्हाला कोणीही  थांबवू शकणार नाही. सर्वात आधी, तुमच्या ब्राउजर मध्ये विकीपिडिया आणि गूगल स्कॉलर यांसारख्या महत्वाच्या गोष्टींना बुकमार्क करा. नंतर रोजच्या रोज तुमच्या विषयाशी संबंधित बातम्या आणि आवडीच्या विषयांवरील माहिती गूगल न्यूज वरून वाचण्याची सवय लावून घ्या. त्यामुळे रोजच्या नविन घडामोडी तुम्हाला समजत रहातील.

 

नियम 2 : गरज असेल तिथे दूसऱ्यांना मान द्या

एखाद्याचे काम पाहून त्याचे अनुकरण करणे हा खुशामत करण्याचा एक उत्तम उपाय आहे

पण, शिक्षणाच्या बाबतीत नाही!

तुम्ही एखादा लेख, शोधनिबंध किंवा वेबसाइट वरून काही माहिती घेतलीत, तर त्याची हायपरलिंक द्या किंवा त्याचा स्त्रोत नमूद करा. असे करण्याने साहित्य चोरी चा आरोप टाळता येईल.

 

नियम 3 : तुमच्या डेटा चा नियमितपणे बॅकअप घेत रहा

जेव्हा कधी तुम्ही फाइल मध्ये काही बदल कराल, किंवा नविन फाइल अॅड कराल, तेव्हा तुमच्या डेटा चा बॅकअप घ्या. बॅक अप शेड्यूल करून ठेवल्याने तुम्ही ते विसरण्याची काळजी नसते. जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या प्रकल्पावर काम करत असाल, तर रोजच्या रोज बॅक अप घ्या.

 

नियम 4 : इमेल शिष्टाचार लक्षात ठेवा

हे अगदी साधे वाटते पण तुम्ही तुमचे म्हणणे कसे मांडता यावर तुमचे यश अवलंबून असते. उदाहरणार्थ, ज्या इमेल्स मोठ्या असतात आणि मुद्देसूद नसतात त्यांचा काही फायदा नसतो. नेहमी तुमच्या मुद्द्यानुसारच विचार मांडा आणि तुम्ही अटॅचमेंट जर पाठवत असाल तर त्यांची नावे मेल मध्ये नमूद करा.

 

नियम 5 : सोशल मिडिया वर काय करावे आणि काय करू नये याबद्दल जे नियम असतात त्याचे पालन करा

हे करा

तुमच्या प्रायवसी सेटिंग्ज वर नियंत्रण ठेवा

नकारात्मक गोष्टींपासून लांब रहा

योग्य त्या नेटवर्क वर योग्य त्या माहितीचा वापर करा

व्यावसायिक आणि वैयक्तिक अकाउंट्स वेगवेगळे ठेवा

तुमचे सोशल मिडिया प्रोफाइल्स पूर्ण करून नेहमी अद्यावत ठेवा

हे करू नका

खूप जास्त पोस्ट टाकू नका

पोस्ट कधीही कॅपिटल मध्ये टाइप करू नका

करियर मध्ये यश मिळवायचे असेल तर शिक्षकांनी ज्ञान संपादना बरोबरच अप-स्किलिंग (कौशल्ये विकसित करत रहाणे) महत्वाचे असते. याने तुम्हाला तर फायदा होइलच त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही जास्तीत जास्त शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील.