हाय स्कूल मध्ये (माध्यमिक शाळेत) जाण्यापूर्वी तुमच्या मुलांनी शिकावीत अशी 5 जीवन कौशल्ये

 

अनुकूल आणि सकारात्मक वर्तनासाठीची मानसशास्त्रीय क्षमता जी मनुष्याला दैनंदिन जीवनात येणा-या विविध आव्हानांचा सामना करण्यास सक्षम बनवते, अशी "लाइफ स्किल्स (जीवन कौशल्ये)" ची व्याख्या केली जाते. 

माध्यमिक शाळेत जाण्यापूर्वी तुमच्या मुलांनी शिकावीत अशी पाच जीवन कौशल्ये पुढे दिली आहेत :

1. वेळेवर उठणे

आत्ता सध्या तुमच्या मुलांचे गजराचे घड्याळ तुम्हीच आहात, परंतु मुले हॉस्टेल वर रहायला गेली किंवा कामानिमित्त दूर गेली तर त्यांना वेळेवर उठविणे तुम्हाला शक्य होईल का? कोणाचीही मदत न घेता वेळेवर उठण्यास शिकणे हे महत्वाचे जीवन कौशल्य आहे. शाळा रोज एकाच वेळेवर सुरू होते ही अतिशय चांगली गोष्ट आहे!

2. जेवण बनवणे

जेवण बनविण्यासाठी जेव्हा तुम्ही घरी नसता, तेव्हा बाहेरून जेवण मागविणे किंवा बाहेर जेवायला जाणे हे पर्याय अवलंबिले जातात. क्वचित कधीतरी तसे करणे ठीक आहे त्यापेक्षा परंतु घरी शिजवलेले, पौष्टीक अन्न खाणे हे नेहमीच चांगले असते. आधी लहान लहान गोष्टींपासून सुरूवात करा. उदाहरणार्थ - चहा बनविण्यासाठी पाणी उकळणे इत्यादी. मग हळूहळू त्यांना संपूर्ण जेवण बनविणे शिकवा.

3. कुटुंबातील लहान सदस्यांची काळजी घेणे

जबाबदारीने वागण्याची सुरूवात घरापासूनच करणे योग्य असते. स्वतःचा धाकटा भाऊ किंवा बहीण, नातेवाइकांची किंवा शेजा-यांची मुले यांची किमान थोड्या वेळासाठी काळजी घेणे यामुळे, स्वतःबरोबरच तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींची जबाबदारी घेण्याचे शिक्षण मिळते. मोठे झाल्यावर त्याची फार मदत होते.

4. वेळापत्रक बनविणे आणि त्याचे पालन करणे

शाळा, शिकवण्या, खेळ, समाज-जीवन आणि घरातील जबाबदा-या या सर्वांसाठी लागणा-या वेळाचा योग्य समतोल राखणे हे तुमच्या मुलांनी शिकावे असे सर्वात महत्वाचे जीवन कौशल्य आहे. वेळेचे नियेजन करणे मुले जितक्या लवकर शिकतील तितके त्यांना मोठेपणी आव्हाने पेलण्यास सोपे होईल.

5. पीसी वापरण्यात सराईत होणे

डिजिटल पालक असल्यामुळे तुम्हाला हे तर माहितच आहे की तंत्रज्ञानापासून आपण दूर जाऊ शकत नाही. घरी किंवा शाळेत, पीसी हे तुमच्या मुलांचे पहिले शैक्षणिक गॅजेट (उपकरण) असते. काही काळ सराव केल्यानंतर तुमची मुले, अभ्यासासाठी, नविन छंद जोपासण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी पीसीचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यायचा ते स्वतःच शिकतील.

2018 हे PC चे वर्ष आहे यात काही संदेह नाही!