तुमच्या मुलांना अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी करण्याची पाच कारणे

 

उठणे
शाळा
ट्यूशन्स
झोपणे
पुनरावृत्ती

यात काय कमी आहे?

तुमच्या मुलांना आवडणारा आणि अपेक्षा असणारा एखादा उपक्रम

रोज रोज तेच वेळापत्रक पाळण्यातील कंटाळवाणेपणाची कल्पना करून पहा. ही तीच भावना आहे जी मोठ्या माणसांना काम आणि घर या वेळापत्रकाचे पालन करताना जाणवते. तुम्हाला याची कल्पना असेलच आणि आयुष्यात कधीतरी तुम्ही याचा अनुभव देखिल घेतला असेल.

तुमच्या मुलांना अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी करून तुम्ही त्यांना मजा करण्याबरोबरच त्यांचा वेळ सृजनात्मक रीतीने वापरण्याची संधी देत असता. पुढे त्यासाठी आणखी पाच कारणे दिली आहेत -

1. अभ्यासातून थोडा मोकळा वेळ मिळण्यासाठी हे अत्यंत गरजेचे असते

हल्ली अभ्यास आणि परीक्षा जास्तीत जास्त स्पर्धात्मक होत आहेत त्यामुळे खेळांमध्ये सहभागी होणे किंवा नृत्य, योगा किंवा कला यांसारख्या छंदांमध्ये वेळ गुंतवणे हे तुमच्या मुलांना आलेला परीक्षेचा ताण घालविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

2. संघामध्ये काम कसे करावे ते शिकण्याची एक संधी

सांघिक उपक्रमांमध्ये नियमितपणे भाग घेतल्याने मुलांच्या मनात संघभावना निर्माण होऊन ती इतरांबरोबर मिळूनमिसळून वागण्यास शिकतात. तसेच इतर मुलांकडून त्यांना विविध कौशल्ये शिकता येतात व अनोळखी लोकांशी बोलताना घाबरण्यासारख्या गोष्टींबद्दलची भिती त्यांच्या मनातून निघून जाते.

3. वेळेचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य शिकणे - हे सरावानेच जमू शकते

अभ्यासेतर उपक्रमांमध्ये भाग घेतल्यानंतर जबाबदा-यांची प्राथमिकता समजून घेऊन अभ्यास आणि खेळ यांच्यात योग्य तो समन्वय साधावा लागतो. याचा फायदा मुलांना त्यांचे दिवसभराचे वेळापत्रक परिणामकारक रीतीने ठरवून त्याप्रमाणे वागण्यासाठी होतो. परंतु हे कौशल्य आत्मसात करून त्यात पारंगत होण्यासाठी सरावाची गरज भासते.

4. महत्वाच्या सामाजिक कौशल्यांचा विकास

नविन व्यक्तींशी संवाद साधण्याचा आणि एकत्रितपणे उपक्रमांमध्ये भाग घेण्याचा बौद्धिक तसेच भावनिक दोन्ही प्रकारे फायदा होतो. याने मुलांना नविन मित्र बनविण्यास मदत मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास देखिल वाढतो.

5. काहीतरी नविन जाणून घेणे

अभ्यासेतर उपक्रम केवळ खेळांपुरतेच मर्यादित राहावेत असे नाही. पीसी मुळे शिक्षण सोपे बनले आहे आणि पूर्वीपेक्षा कितीतरी पटींनी आवाक्यात आले आहे. आता विविध गोष्टी सहजतेने शिकता येतात. कॅनवा चा वापर करून तुम्ही तुमच्या मुलांना डिजिटल आर्ट शिकायला सांगू शकता किंवा Code.org च्या मदतीने कोडिंगमधील मूलभूत गोष्टी शिकायला प्रोत्साहन देऊ शकता. शाळेने जर या गोष्टी मुलांसाठी देऊ केल्या नसतील तर तुम्ही शाळेच्या व्यवस्थापनाकडे त्यासाठी मागणी करू शकता किंवा मुलांना स्वतःहून पुढाकार घ्यायला प्रोत्साहन देऊ शकता.

जेव्हापर्यंत तुमच्या पाल्याला उपक्रम आव्हानात्मक वाटत आहे, आणि त्याचे मनोरंजन होत आहे, तोपर्यंत तो परत कधीही तुम्हाला हे सांगणार नाही की, "मम्मा, मला कंटाळा आला आहे". :)