येत्या नवीन वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याने हे पाच संकल्प (निश्चय) जाणीवपूर्वक करावेत

 

तुमच्याकडे कॉम्प्युटर आहे, तुमच्या मनात पक्के नियोजन आहे आणि २०१८ हे वर्ष माझ्या आयुष्यातलं सर्वोत्तम वर्ष असलं पाहिजे, असा ध्यास आहे; हो ना? मग त्यासाठी काही संकल्प म्हाजेचं निश्चयसुद्धा केले पाहिजेत. चला बघूया, कोणते निश्चय केले तर तुमचं ध्येय तुम्हाला निश्चितपणे गाठता येईल.

१) मी रोज वाचन करण्याची सवय करीन.

वास्तववादी असो किंवा काल्पनिक असो, तुमच्या कॉम्प्युटर म्हणजेच पीसीवर किंवा प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन तुम्ही पुस्तकातले एक प्रकरण जरी रोज वाचलेत, तरी तुम्ही तुमच्या वर्गामित्रांपेक्षा एक पायरी वर चढलात असे समजा; कारण तुम्ही नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न तर करत आहातच पण त्याचवेळी तुमचे सगळे ताण-तणाव सुद्धा बाजूला सारले जात आहेत, आपोआपच!

२) मी एकावळी एकच गोष्ट चांगल्या रीतीने पार पाडीन.

पहिल्यांदा हे थोडं कठीण जाईल; पण अशक्य मात्र अजिबात नाही. कारण एका वेळी एकाच गोष्ट केल्यामुळे तुमची एकाग्रता वाढते आणि छोट्या छोट्या चुका होण्याची शक्यता सुद्धा कमी होते. समजा, एक तासभर जर तुम्ही कोणताही व्यत्यय येऊ न देता तुमचा एखादा निबंध लिहू शकलात; तर हा सराव तुम्हाला आधीपेक्षा खूप सक्षम बनवेल.

३) क्लाऊड स्टोरेजच्या मदतीने मी माझ्या सगळ्या फाईल्सचा बॅक-अप घेईन.

समजा तुम्हाला शाळेत आणि घरी वेगवेगळे कॉम्प्युटर वापरावे लागत असतील, तरी ग्रुप असाईनमेन्ट (गट-कृती) करताना कोलॅबोरेशन (एकत्रितपणे काम) आवश्यक असेल किंवा जास्तीचा बॅक-अप घेऊन ठेवण्याची गरज वाटत असेल, तर तुम्हाला क्लाऊड स्टोरेजची मदत घेता येते. त्यासाठी तुम्हाला फक्त इन्टरनेटची आवश्यक आहे.

४) सोशल मिडियावर कोणतीही पोस्ट मी विचारपूर्वक टाकीन.

सोशल मिडीया म्हणजे ही एक मोठी करमणूक आहे आणि सगळ्यांनाच खूप आवडतं इथे स्वच्छंद विहार करायला. मात्र, तुम्ही जे जे काही इथे पोस्ट करता, ते अगदी कायमस्वरूपी होऊन जातं. त्यामुळे तुम्ही काय शेअर करत आहात, काय लिहित आहात, याबद्दल अगदी सतर्क राहा, काळजी घ्या. कारण ती एखादी गोष्ट दुसऱ्या कुणा व्यक्तीवर किंवा अगदी तुमच्यावरसुद्धा परिणाम करू शकते – व्यावसायिकदृष्ट्या किंवा वैयक्तिकदृष्ट्या

५) मी घोकंपट्टी/पाठांतरावर भर देणार नाही.

“घोकंपट्टी/पाठांतर” हा एक असा प्रकार आहे, जो आपण सगळेच करतो आणि आपल्या मित्रांना किंवा आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलांनाही त्याच मार्गाने जायला प्रोत्साहन देत असतो. मात्र यावर्षी, अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न करा की, जे शिकवलं आहे ते प्रयत्नपूर्वक समजून घेऊ; म्हणजे परीक्षेनंतर सुध्दा खूप काळासाठी ते तुमच्या लक्षात राहू शकेल.

घोकंपट्टी/पाठांतर हा पहिल्यांदा अगदी सोपा आणि चटकन यश देणारा मार्ग वाटतो. पण विचार करा – तुम्ही तासनतास पाठांतर करून एकामागून एक प्रकरने अक्षरश: संपवता; पण परीक्षेनंतर काय होतं? डोक्यातून सगळं पुसलं गेलेलं असतं! पण ह्याऐवजी, वेळ आणि एकाग्रता या योग्य साधनांच्या मदतीने, तुम्ही त्या विषयावर प्रभुत्त्व मिळवू शकता आणि तेही पुढची अनेक वर्षं; कारण ते तुमच्या डोक्यातून पुसलं जाऊ शकत नाही.

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा.