अभ्यासातून थोडी मोकळीक मिळविण्यासाठी तुम्ही वापरून पहाव्यात अशा पाच कल्पना

 

 

परीक्षेचा काळ तणावकारक असू शकतो. भूक न लागणे, झोप न येणे किंवा लक्ष एकाग्र न होणे या सर्व गोष्टींचा तुमच्या अभ्यासावर आणि परीक्षेत मिळणा-या गुणांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पुढे दिलेल्या, अभ्यासातून थोडा मोकळा वेळ काढण्यासारख्या गोष्टींचा वापर केल्यास तुमच्यावरील अभ्यासाचा दबाव कमी होऊ शकतो आणि त्यामुळे परीक्षेदरम्यान तुम्ही तणावमुक्त राहू शकता.

अभ्यासातून थोडावेळ मोकळीक घेऊन तुम्ही पुढील पाच गोष्टी केल्या पाहिजेत :

1. मित्राला फोन करणे

मोकळेपणाने हसण्यासाठी किंवा खेळांबद्दल चर्चा करून मनाला तणावमुक्त करण्यासाठी तुमच्या आवडत्या मित्राला कॉल करा. आपल्या आवडत्या व्यक्तीशी थोडावेळ बोलल्याने आपल्याला बरे वाटते. परंतु तसे करताना गप्पा जास्त वेळ मारल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. तुम्ही ज्या विषयाचा अभ्यास करत आहात त्या विषयावर आधारित प्रश्न तुमच्या मित्राला विचारायला सांगितल्याने देखिल मदत होऊ शकते.

2. ब्रेनरसाइज

मेंदू प्रशिक्षित करणा-या उपक्रमांमुळे तुमची समस्या सोडविण्याची कौशल्ये विकसित होतात, तुमची शब्दसंपदा वाढते आणि तुमच्यावरील अभ्यासाचा दबाव कमी होतो. अभ्यासातून थोडा वेळ काढून crossword (कोडी), Sudoku (सुडोकू) इत्यादी सोडवा, थोडावेळ Lumosity खेळ खेळा. या सर्व गोष्टींमुळे तुम्ही चाणाक्ष, सतर्क बनाल आणि परत अभ्यास करण्यासाठी ताजेतवाने व्हाल.

3. प्रेरणा घ्या

अभ्यासाला बसायच्या आधी, तुम्हाला प्रेरणा देणा-या व्यक्तींची किंवा तुम्हाला भुरळ घालणा-या गोष्टींची यादी बनवा. त्यांची चित्रे किंवा त्यांची प्रेरणादायी वाक्ये गोळा करून तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या डेस्क जवळ एका बोर्ड वर लावून स्वतःसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण करू शकता. त्याचप्रमाणे, तुमचे उद्दिष्ट आणि ते साध्य केल्यावर तुम्हाला मिळणारे बक्षिस हे लिहून ठेवल्याने देखिल प्रेरणा मिळू शकते. तुमच्या मोकळ्या वेळात TED talks वाचल्याने किंवा पाहिल्याने सुद्धा तुम्हाला प्रोत्साहन मिळेल.

4. सर्जनशील बना

तुमच्या मधील सर्जनशीलतेचे मार्गदर्शन घ्या. मोकळ्या वेळात, गिटार वाजविणे किंवा रेखाटने काढणे यांसारख्या तुमच्या अभ्यासाशी संबंधित नसलेल्या गोष्टी करा. त्याने तुमचे मन परत ताजेतवाने होईल आणि तुम्हाला अभ्यास करायला हुरूप येईल.

5. तुमची बकेट लिस्ट अद्यावत ठेवा

बकेट लिस्ट तयार करणे हा तुमचे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने स्वतःला प्रेरणा देत रहाण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही जर तुमची बकेट लिस्ट तयार केली नसेल, तर ती लगेच बनवा. एका वर्ड डॉक्यूमेंट मध्ये तुम्हाला पहायची इच्छा असलेल्या सर्व जागा, खायची इच्छा असलेले खाद्यपदार्थ आणि तुम्हाला करून पहायची सर्व साहसी कामे यांची यादी तयार करा, त्यांच्या लिंक्स आणि चित्रे देखिल समाविष्ट करा त्याने तुमची स्वतःची बकेट लिस्ट तयार होईल. तुमच्या अभ्यासात जेव्हा जेव्हा तुम्ही काही चांगले कराल तेव्हा प्रत्येक वेळी बकेट लिस्ट मध्ये एका नविन गोष्टीची नोंद करा.

प्रकल्पांपासून ते सादरीकरणांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये योग्य तांत्रिक साधनांचा वापर करून अभ्यास सुकर करा.