प्रत्येक विद्यार्थ्याने अवलंब करावा, अशा पाच अभ्यास-युक्त्या

 

परीक्षेच्या किंवा प्रकल्प द्यायच्या आदल्या दिवशी, दिवस-रात्र एक करणे, म्हणजे अभ्यास करणे नाही.

जेवढ्या लवकर तुम्ही अभ्यासाला सुरवात कराल, तो विषय तुम्हाला तेवढाच लवकर समजेल आणि त्यामुळे तुमच्या गुणांमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील तेवढीच वाढते. [1]

कॉम्प्युटर तुम्हाला फक्त परीक्षेतील गुण वाढवायलाच मदत करत नाही, तर अभ्यासातल्या अवघड किंवा क्लिष्ट संकल्पना समजून घ्यायला आणि संशोधन करायला देखील मदत करतो.

कॉम्प्युटरच्या मदतीने अभ्यास केल्यास तुम्हाला कसे फायदे होतील, हे सांगणाऱ्या पाच अभ्यास-युक्त्या इथे दिलेल्या आहेत.

 

1. वेळापत्रक तयार करा आणि ते तंतोतंत पाळा

वेळापत्रक तयार केल्यामुळे, तुम्हाला किती धडे तयार करायचे आहेत आणि त्यासाठी किती वेळ लागेल, याचे चित्र स्पष्ट होईल. नियमित अभ्यासाचा एक दिनक्रम (रुटीन) ठरवण्यासाठी गुगल कॅलेंडरसारखी टूल्स उपयुक्त ठरतात. या वेळापत्रकात विश्रांतीच्या नियमित वेळा देखील निश्चित करा.

 

2. वर्गात नोट्स (नोंदी) काढा

नोंदी घेणे किंवा नोट्स काढणे म्हणजे वर्गात शिकवलेला अभ्यास-विषय एकप्रकारे स्टोअर करून ठेवणे. नंतर, परीक्षेची तयारी करताना किंवा प्रोजेक्टवर काम करताना या नोट्स संदर्भ म्हणून खूपच उपयुक्त ठरतात. कागद तर हे काम उत्तम प्रकारे करतोच, पण वर्ड प्रोसेसरला अधिक प्राधान्य दिले तर, तुम्ही इंटरनेटवरील संदर्भ आणि लिंक्सच्या मदतीने तुमच्या स्वत:च्या नोंदी तयार करू शकता.

 

3. वर्गात शिकलेल्या संकल्पनांचे दैनंदिन आयुष्यात उपयोजन करायला शिका

अभ्यास करताना, थिअरी (लिखित सिद्धांत) आणि प्रॅक्टिस (प्रत्यक्ष कार्यानुभव) यामध्ये दुवा शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही वर्गात शिकलेल्या गोष्टी जर दैनंदिन जीवनातील गोष्टींशी जोडून पाहिल्यात, तर तो अभ्यास तुम्हाला अधिक चांगल्या रितीने लक्षात राहील. व्हिडिओ पाहणे, मेकरस्पेस प्रोजेक्टचा[2] सराव करणे, आणि शैक्षणिक खेळ (एज्युकेशनल गेम्स) खेळणे,[3] या सराव गोष्टींमुळे अविविध अभ्यास-संकल्पना तुम्हाला दृश्य स्वरूपात पाहता येतात आणि त्यामुळे त्या अधिक सहज आणि स्पष्टपणे समजायला मदत होते.

 

4. स्व-परीक्षण करा आणि चुकांमधून शिका

एक ठराविक धडा किंवा टॉपिक अभ्यासल्यावर, त्याताली माहिती लक्षात ठेवण्यासाठी तेच पुन्हा पुन्हा अभ्यासत किंवा वाचत बसण्यापेक्षा, स्वत:चीच परीक्षा घेणे कधीही चांगले.[4] काही ऑनलाईन टूल्स (साधने) वापरून तुम्ही झालेल्या अभ्यासावर स्व-परीक्षण करू शकता. सुरवातीला जरी सगळ्या गोष्टी बरोबर आल्या नाहीत, तरी तुम्ही कुठे चुका केल्या आहेत, हे समजायला सुद्धा तुम्हाला मदत होईल आणि पुढच्यावेळी त्या चुका तुम्ही टाळू शकाल.

 

5. शिककेल्या गोष्टींची नियमित उजळणी

सातत्य हे यशाचे गमक असते. तुमच्याकडील अभ्यास-साहित्याची (स्टडी मटेरियल) सतत उजळणी करत राहा आणि शक्य झाल्यास रोज तसेच प्रत्येक आठवड्याला देखील ऑनलाईन संदर्भ पाहात राहा. यामुळे एखादी गोष्ट तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी लक्षात राहायला तर मदत होईलच, शिवाय परीक्षेच्या एक दिवस आधी अभ्यास करताना येणारे मानसिक दडपण सुद्धा खूप कमी होईल.

प्रभावी अभ्यासपद्धतीचा सराव आणि अवलंब केल्यास अध्ययन आणि संकल्पना दोन्ही स्पष्ट होण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या अभ्यास पद्धतीवर सुलभतेने नियंत्रण मिळवू शकता, परिणामी तुमच्या शाळेचा प्रकल्प असो किंवा परीक्षा, तुम्हाला यश मिळतेच!