घोकंपट्टी न करता अभ्यास करण्याचे तीन मार्ग

 

महत्वाची सूत्रे आणि जटील नावे लक्षात ठेवायची असतात, तेव्हा घोकंपट्टीची आवश्यकता भासतेच, परंतु संपूर्ण अभ्यासासाठी ती पद्धत वापरणे चूकीचे आहे. केलेल्या अभ्यासाचा दीर्घकाळ फायदा होण्यासाठी अभ्यासाच्या वेळापत्रकात थोडासा बदल करून त्यात मनोरंजक पद्धतीने अभ्यास होण्यासाठी पीसी चा वापर करता येईल.

जेव्हा तुम्हाला घोकंपट्टी करायची नसेल तेव्हा अभ्यास करण्याचे पाच मार्ग :

1. तुमचे स्वतःचे "पाठ्यपुस्तक" लिहा

तुम्ही जे काही शिकाल ते तुम्हाला सोप्या वाटेल अशा पद्धतीने आकृत्या, माइंड मॅप्स (रेखाटने), सादरीकरण पत्रके इत्यादी स्वरूपात लिहून काढा. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अभ्यास करताना तुम्ही पूर्णपणे जागरूक असाल आणि तुमचा सर्व अभ्यास एकत्र उपलब्ध असेल.

2. जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत प्रयत्न करा, शिका, अयशस्वी व्हा आणि परत करा

यात थोडा वेळ खर्च होतो पण त्याचा फायदा देखिल खूप होतो. मेकरस्पेस प्रकल्प करत एखादा सिद्धांत तपासून पहाणे किंवा एखाद्या नविन भाषेत संपूर्ण संभाषण करण्याचा प्रयत्न करणे यांसारख्या गोष्टींमध्ये पूर्णपणे प्राविण्य मिळेपर्यंत ते करत राहिल्यास त्याचा भविष्यात खूप फायदा होईल.

3. संवादात्मक शिकण्यावर भर द्या

संवादात्मक शिक्षणामध्ये विषयाची संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी संवाद आणि चर्चा यांवर भर दिला जातो. यासाठी वर्गमित्रांचा समूह तयार करा, एकत्र बसून उत्तरे शोधा आणि महत्वाचे सिद्धांत आणि संकल्पना यांबद्दल एकमेकांची परीक्षा घ्या.

4. तुम्ही जी माहिती शिकला आहात त्यामधून स्वतःसाठी प्रश्नमंजुषा तयार करा

जुन्या प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करणे ही उत्तम गुण मिळविण्यासाठी अत्यंत उपयुक्त पद्धत आहे हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही क्विझलेट चा वापर करून, स्वतः साठी प्रश्नपत्रिका तयार करू शकता आणि त्या स्वतःच तपासून कोणत्या विषयाची तयारी पूर्ण झाली आहे ते समजून आत्मविश्वास मिळवू शकता.

5. संकटापासून बचावासाठी फ्लॅशकार्ड्स

मुख्य परीक्षेच्या काही दिवस आधी, स्वतःसाठी क्रॅम वर फ्लॅशकार्ड्स तयार करा आणि रोज त्यांचा अभ्यास करा. त्याने तुमचा सर्व अभ्यास हातांच्या बोटांवर तयार असल्याचे समाधान मिळेल. परीक्षेच्या आधी केवळ एक किंवा दोन वेळा उजळणी करण्यापेक्षा, तुम्ही तयार केलेल्या नोट्स रोज वाचल्याने परीक्षेच्या दिवशी सर्व काही नीट आठवण्याची शक्यता जास्त असते.

अभ्यासाच्या या सर्व पद्धतींचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुमच्या अभ्यासाच्या वेळापत्रकात संशोधनाचा अंतर्भाव करा. पीसीच्या मदतीने संशोधन जलद गतीने तर होतेच, पण त्याचबरोबर तुम्ही जे काही वाचता ते जतन करून त्याचा तुमच्या नोट्स मध्ये अंतर्भाव करण्याचा देखिल हा एक परिणामकारक मार्ग आहे. एकंदरीतच तुमच्या उजळणी साठी ही विन-विन परिस्थिती (विजयी ठरणे) ठरते.