तुमच्या विद्यार्थ्यांची चिंतन कौशल्ये वाढविण्यासाठी पाच मार्ग

 

क्रिटिकल थिंकिंग हा केवळ नाद नसून आत्ताच्या मुलांना भविष्यात उपयोगी पडणारे *निर्णायक* (चिंतन) कौशल्य आहे.

सोप्या शब्दांत सांगायचे तर, ही दोन्ही बाजूंनी मिळालेल्या माहितीची शाहनिशा करून स्वतःचे मत बनविण्याची आणि गरज भासल्यास विरोध करण्याची क्षमता असते. तुमचे विद्यार्थी वर्गात शिकविल्या गेलेल्या संकल्पनांच्या मागचे तर्कशास्त्र समजून घेऊ शकतील, ज्याचा त्यांना परीक्षेच्या वेळी उत्तरे आठविण्यास उपयोग होईल आणि त्यांना घोकंपट्टी करण्याची गरज भासणार नाही.

पुढे दिलेल्या पाच मार्गांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांची चिंतन कौशल्ये वाढवू शकता :

1. दिवसातील महत्वाचा प्रश्न

तुमचा धडा शिकवून झाल्यानंतर मुलांना कोड्यात पाडणारा एखादा प्रश्न विचारा उदाहरणार्थ - "जग जर सपाट असते तर". अशा प्रकारचा एखादा उपक्रम दिल्यास, मुले त्या विषयावर अधिक वाचन करून त्या सिद्धांतामागचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतील.

2. "का"

स्वतःच सगळी उत्तरे सांगण्यापेक्षा, शिकविलेल्या सिद्धांतामागचे कारण विद्यार्थ्यांना शोधण्यास सांगा. उदाहरणार्थ - त्यांना "पाने हिरव्या रंगाची का असतात" हे विचारा आणि काय उत्तरे येतात ते पहा. अशा उपक्रमांमुळे तुमचे विद्यार्थी वर्गात आनंदाने आणि एकाग्रतेने लक्ष देतील.

3. वादविवाद चांगले असतात

गणवेश अनिवार्य का असतो यांसारख्या, विद्यार्थ्यांना ज्या गोष्टींमध्ये खरोखर रूची आहे अश्या मुद्द्यांवर वर्गात वादविवाद घडवून आणा. तुमचे विद्यार्थी गंभीर विषयांवर चर्चा करण्यास योग्य झाले असे जेव्हा तुम्हाला वाटेल, तेव्हा त्यांना वादविवादास गंभीर विषय द्या.

4. कनेक्ट द डॉट्स (दुवे जोडा)

माइंडमिस्टर सारखे एखादे तांत्रिक साधन वापरून विविध सिद्धांतांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते पहा. असे संबंध शोधल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सिद्धांत लक्षात ठेवणे सोपे जाते. सरतेशेवटी फक्त मिळविलेल्या गुणांनाच महत्व असते.

5. हे खरे आहे की खोटे?

गूगल फॉर्म्स किंवा सर्वे मंकी सारख्या गोष्टींचा वापर करून तुमच्या विद्यार्थ्यांना 'खरे की खोटे' यासंदर्भात उत्तर देण्यास कठीण असे प्रश्न विचारा. याची सुरूवात बझफीड सारख्या संदर्भापासून करा.

पीसी चा वापर आणि शिकविलेल्या संकल्पनांचे जास्त आकलन यांच्यातील परस्पर संबंध यांबद्दल शिक्षकांमध्ये नेहमीच चर्चा होत असते. यामागचे कारण असे की, पीसी तुमच्या विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्यास सक्षम बनवतो आणि मुले आवडीने अभ्यास करू लागतात.