तुमच्या अपत्यांच्या शैक्षणिक क्षमतांचा विकास करण्याच्या पाच पद्धती

‘‘शिक्षण हे पाया असते ज्यावर आपण आपले भविष्य उभारतो,’’ क्रिस्टिन ग्रेकरी

 

आईवडिलांसाठी, शिक्षण पद्धतीनुसार केवळ अभ्यास करण्यापेक्षा त्यांच्या मुलामुलीनी शाळेत उत्तम यश मिळविलेले पाहण्यासारखा अभिमानाचा क्षण नसतो. शाळेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी बालकांची शैक्षणिक क्षमता लहान वयातच विकसित करावी लागते. तुम्हाला तुमच्या अपत्याला मदत करता यावी यासाठी ह्याठिकाणी तुम्हाला मदत करणारे टप्प्याटप्प्याचे मार्गदर्शन येथे देण्यात आले आहे :

१) वाचनाची रोजची सवय लावा
दररोज वाचन करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या अपत्याला विचारशक्ती आणि लिखाणाची शैली सुधारण्याची संधी मिळते. वर्तमान पत्रातील तो क्रीडा विभाग असो किंवा सुंदर कादंबरितील उतारा असो, दररोज वाचण्यामुळे तुमच्या अपत्याला नवीन शब्द माहित होतील आणि भाषेचा संदर्भ समजेल.

२) त्यांची सृजनशीलता सुधारणे
प्रत्येक वयोगटासाठी आणि प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे एक मेकरस्पेस प्रकल्प असतो, तुम्हाला फक्त तुमच्या अपत्यांना आवडीचा विषय शोधण्यासाठी धक्का द्यावा लागेल आणि साहित्य द्यावे लागेल. प्रत्येक मेकरस्पेस प्रकल्प तुमच्या अपत्याला काही तरी नवीन शिकवतो. एखादा कठिण वाटणारा टास्क पूर्ण करण्यामुळे जिंकल्याचा मिळणारा आनंद हा अद्वितीय असतो!

३) त्यांना खेळायला लावा
तुमच्या अपत्याच्या नेहमीच्या अभ्यासात खेळांचा समावेश करण्याचा सर्वोत्कृष्ट फायदा म्हणजे ते खेळताना कधीही ‘‘मला कंटाळा आला’’ असे म्हणणार नाहीत. परीक्षेसाठी अभ्यास करताना तो एकतर ब्रेक असू शकतो किंवा संपूर्ण अभ्यास पूर्ण केल्याबद्दल दिलेले बक्षिस असू शकते. उत्तम गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांना सर्वोत्कृष्ट प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि त्यांना त्यांच्या क्षमतेचा सर्वोत्तम उपयोग करण्यास मदत होईल.

४) तुमच्या अपत्याची शिकण्याची पद्धती जाणून घेणे


कालांतराने विषयानुसार, तुमच्या अपत्याची अशी अभ्यास करण्याची पद्धती विकसित होईल जी उपयुक्त असेल. आईवडिल ह्या नात्याने, तुम्हाला ती पद्धती ओळखावी लागेल आणि योग्य पीसी स्त्रोत वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल.

५) ठराविक प्रतिसाद देणे
क्षमतांनुसार काम करणे ही वापरलेली आणि चाचणी घेतलेली पद्धती आहे परंतु तुमच्या अपत्याच्या कमजोर विषयांच्या बाबतीत काय?
पहिला टप्पा म्हणजे शिक्षकांना ठराविक, कार्यवाही करण्याच्या प्रतिसादासंबंधी माहिती विचारावी आणि नंतर त्यानुसार मदत घ्यावी. ह्याठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या अपत्याच्या शिक्षकांना खूप प्रश्न विचारा ज्याची उत्तरे फक्त होय किंवा नाही नसतील.

तुमच्या अपत्याच्या यशासाठी पीसी हे अतिशय प्रेरणादायी साधन आहे हे विसरू नका.