5. प्रत्येक शिक्षिकेने बुकमार्क करावे असे यूट्यूब वरील काही चॅनल्स

 

प्रत्येक शिक्षिकेची अशी इच्छा असते की वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी शिकवत असलेल्या विषयाकडे एकाग्रतेने लक्ष द्यावे. परंतु, काही वेळा विद्यार्थी स्वतःच्याच विश्वात दंग असतात किंवा काहीतरी विचारांमध्ये हरवलेले असतात.

मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना 100% लक्ष देण्यास कसे शिकवू शकाल?

वर्गात संवादात्मक व्हिडिओ!

तुम्ही जो विषय शिकवत आहात, त्याच्या अनुसार तास सुरू होताच, अर्ध्या वेळा नंतर, तास संपायला पाच मिनिटे शिल्लक असताना किंवा संपूर्ण तासभर अश्या कोणत्याही वेळी तुम्ही विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आणि त्यांना शिकत असलेली माहिती नीट समजण्यासाठी ते व्हिडिओ वापरू शकता. त्या व्हिडिओज् चा स्त्रोत म्हणून तुम्ही यू ट्यूब वरील सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी आणि सर्व विषयांवरील असणारे शैक्षणिक चॅनल्स वापरू शकता.

प्रत्येक वेळी वर्गातील विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी उपयुक्त असणारे पाच चॅनल्स पुढे दिले आहेत, जे तुमच्या पीसीच्या ब्राऊजर वर तुम्ही बुकमार्क करून ठेऊ शकता :

1. सायशो

विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल कुतुहल निर्माण व्हावे या उद्देशाने या चॅनल वर प्रत्येक गोष्टीवरील माहिती छोट्या छोट्या ॲनिमेटेड व्हिडिओज् च्या स्वरूपात उपलब्ध आहे. मानवी मेंदू पासून ते ओरिगामीमधून प्रेरणा घेऊन लागलेल्या शोधांपर्यंत प्रत्येक व्हिडिओ येथे उपलब्ध असून, व्हिडिओज् ची लांबी पाच मिनिटांपेक्षा जास्त नाही.

लिंक: https://www.youtube.com/user/scishowkids/featured

2. ग्रामरली

लेखनासंबंधीच्या महत्वाच्या मार्गदर्शक सूचना, सामान्यतः ज्या शब्दांबद्दल गोंधळ होतो ते शब्द, आणि व्याकरण या सर्वांना सोपे करून सांगणारे व्हिडिओज् येथे उपलब्ध आहेत. परीक्षेच्या एक आठवडा आधी विद्यार्थ्यांना ते दाखवून त्यांच्या अभ्यासाची पटकन उजळणी करून घेता येईल.

लिंक: https://www.youtube.com/channel/UCfmqLyr1PI3_zbwppHNEzuQ

3. क्रॅश कोर्स

जेव्हा एखाद्या नविन पाठाबद्दल गृहपाठ करायचा असतो किंवा जुन्या एखाद्या कठीण पाठाची उजळणी करायची असते तेव्हा संदर्भ म्हणून क्रॅश कोर्सच्या इंग्रजी साहित्यापासून ते कंप्युटर सायन्स पर्यंतच्या व्हिडिओज् ची खूप मदत होते.

लिंक: https://www.youtube.com/user/crashcourse

4. नॅशनल जिओग्राफीक

नॅशनल जिओग्राफिकच्या छोट्या छोट्या फिल्म्सच्या मदतीने तुम्ही वर्गात शिकवत असलेल्या संकल्पनांना प्रत्यक्ष अनुभवांशी जोडून तुम्ही भूगोलाचा तास अधिक मनोरंजक बनवू शकता. एक निश्चित वेळापत्रक बनवून तुमच्या या फिल्म्सनां वर्गाचा नियमित भाग बनवू शकता.

यू ट्यूब वरील आठवड्याचे वेळापत्रक
सोमवार आणि मंगळवार - निसर्ग आणि पर्यावरण
बुधवार - एक्सप्लोरेशन (शोध)
गुरूवार - विज्ञान
शुक्रवार - फन फॅक्ट्स (मजेशीर सत्य)
शनिवार - साहस आणि टिकून रहाण्याची वृत्ती
रविवार - इतिहास आणि संस्कृती

लिंक: https://www.youtube.com/user/NationalGeographic

5. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (जागतिक अर्थशास्त्र व्यासपीठ)

प्रत्येक व्हिडिओची लांबी पाच मिनिटांपेक्षा कमी असल्याने, विद्यार्थ्यांना जास्त वेळ वाया न घालवता ताज्या बातम्या, जागतीक घडामोडी आणि भविष्यातील योजना इत्यादींसंदर्भात माहिती घेऊन ज्ञान अद्यावत ठेवता येते. याचा त्यांना (ग्रुप असाइनमेंट) समूह मूल्यांकन, समाजशास्त्र आणि वर्गातील वादविवाद सत्रे यांच्यासाठी उपयोग होतो.

लिंक: https://www.youtube.com/user/WorldEconomicForum/featured

पुढची पायरी - गृहपाठ. शिक्षकांना पीसीची प्रत्येक पायरीवर मदत होते. त्यात गृहपाठाचा देखिल समावेश असतो, विशेषतः तुम्ही जर चौकटीबाहेरच्या कल्पना शोधत असाल तर.