सुट्टीच्या काळात करता येतील असे पाच कोर्सेस (अभ्यासक्रम)

 

 

सुट्टी म्हणजे मजा, पण शिकताना मजा येत नाही असं कोण म्हणतं? इ-लर्निंगच्या लोकप्रियतेमुळे, कितीतरी ऑनलाइन कोर्सेस सुरू झाले आहेत. त्यात कला आणि संस्कृती पासून ते कोडिंग आणि विज्ञानापर्यंत सर्व प्रकारांचा समावेश होतो. केवळ बटण दाबून तुम्ही तुमचे ज्ञान वाढवू शकता आणि नविन कौशल्ये शिकू शकता.

1. खान अकादमी तर्फे भौतिकशास्त्र

तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने होणा-या प्रगतीमुळे, मूलभूत संकल्पना नीट समजून घेणे अतिशय महत्वाचे बनत चालले आहे. एखाद्या गोष्टीचे कार्य कसे चालते ते समजण्यासाठी भौतिकशास्त्राचे ज्ञान महत्वाचे असते. खान अकादमीच्या छोट्या कोर्सेसमुळे, गती, ध्वनी आणि प्रकाश यांसारख्या मूलभूत संकल्पना प्रश्नमंजुषा आणि मूल्यांकनांच्या मदतीने सोप्या करून शिकता येतील.

लिंक : https://www.khanacademy.org/

2. इडीएक्स चा वर्च्युअल रिॲलिटी चे कार्य कसे चालते हा कोर्स

वर्च्युअल रिॲलिटी (वीआर) या नविन तंत्रज्ञानाने सध्या जगभरात वादळ निर्माण केले आहे. त्याने जगाशी संवाद साधण्याची पद्धत बदलून टाकली आहे. पण आपल्याला त्याबद्दल कितपत माहिती आहे? त्यामागचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर काय आहे? या कोर्समध्ये तुम्हाला वर्च्युअल रिॲलिटीचा पाया आणि वेबवीआरच्या मदतीने त्याचा वापर कसा करायचा ते शिकता येईल.

लिंक : https://www.edx.org/course/how-virtual-reality-works

3. कोर्सेरा तर्फे, छायाचित्रण मूलतत्वे आणि त्यापुढे : स्मार्टफोन ते डीएसएलआर स्पेशलायझेशन (विशेषीकरण)

तुमच्या सभोवतालच्या सर्व गोष्टींची छायाचित्रे घ्यायला तुम्हाला आवडतात का? छायाचित्रणाच्या, एक्स्पोजर, कंपोझिशन, लाइटिंग आणि त्या पलिकडील इतर विविध पैलूंचा अभ्यास करायला सुट्टीचा काळ अगदी योग्य असतो. या कोर्समध्ये तुम्हाला त्या गोष्टींतील विशेषज्ञांकडून शिकण्याची संधी मिळते.

लिंक : https://www.coursera.org/specializations/photography-basics

4. यूडेमी तर्फे, एक्सेल क्विक स्टार्ट ट्यूटोरिअल : मूलभूत गोष्टी शिकण्यासाठी 36 मिनिटे

शाळेतील प्रकल्पांसाठी माहितीचे विश्लेषण करण्याची पहिली पायरी म्हणजे एक्सेल वर नंबर क्रंचिंग. एक्सेल मध्ये पारंगत होण्यासाठी लागणा-या सॉर्टिंग फिल्टरिंग, पिवट टेबल्स, वीलूकअप आणि यासारख्या इतर अनेक गोष्टी या कोर्स मध्ये शिकविल्या जातात.

लिंक : https://www.udemy.com/excel_quickstart/

ऑनलाइन उपलब्ध असलेल्या अगणित कोर्सेस पैकी हे चार उदाहरणादाखल दिले आहेत. अश्या प्रकारच्या कोर्सेस मधून हे समजून येते की शिक्षण हे शाळेपुरतेच मर्यादित राहण्याची गरज नसते. हे करत असतानाच तुमच्या आवडीच्या आफ्टर-स्कूल क्लब्ज मध्ये देखिल नाव नोंदवायला विसरू नका.