भविष्यात टिकून राहतील असे चार व्यवसाय

 

"इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (माहिती तंत्रज्ञान) आणि व्यवसाय हे आता एकमेकांत अत्यंत बेमालूमपणे मिसळले आहेत. या दोघांपैकी कोणत्याही एकाबद्दल अर्थपूर्ण बोलायचे असेल तर दूस-याचा उल्लेख केल्याशिवाय ते बोलणे पूर्ण होणार नाही असे मला वाटते"

- बिल गेट्स.

आज शाळेत प्रवेश घेणा-या मुलांपैकी 65% मुले ही भविष्यात आपल्याला अद्याप आकलन न झालेले कोणत्यातरी वेगळ्याच प्रकारचे काम करतील.  [1] ती कामे कोणती असतील त्याचे नवल वाटते.

3D डिझाइन स्पेशालिस्ट

3D डिझाइन स्पेशालिस्टला 3D टूल्स बद्दल आणि त्याच्याशी संबंधित डिझाइन ॲप्लिकेशन बद्दल चांगली माहिती असते. या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी डिझाइन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि इंडस्ट्री मध्ये लागणा-या सॉफ्टवेयर्स बद्दल सखोल माहिती इत्यादी कौशल्ये असावी लागतात.

वर्च्युअल रिॲलिटी एक्स्पिरिअन्स डिझाइनर

वर्च्युअल रिॲलिटीमध्ये तुम्ही एका विशिष्ट हेडसेटच्या सहाय्याने कंप्यूटर निर्मित परिसरात आभासी जगाचा वेगळा अनुभव घेऊ शकता. यात डिझाइनर विचारपूर्वक संशोधन करून, धोरणे आखून अगदी ख-या जगासारखे आभासी जग निर्माण करतो. योग्य तांत्रिक कौशल्यांसोबत निर्माणक्षमता असलेले आणि ग्राहकाच्या आवडीची योग्य पारख असणारे उमेदवार या कामाकरिता निवडले जातील. वर्च्युअल ट्रेनिंग कॉन्फरन्सेस, टीम मिटींग्ज, दुर्गम भागात घालविल्या जाणा-या सुट्ट्या, फँटसी रनिंग ट्रेल्स आणि अन्य अनेक गोष्टींमध्ये वीआर साठी खूप संधी आहेत.[2]

डिजिटल करन्सी ॲडवायजर्स

गुंतवणूकींचे व्यवस्थापन करण्यासाठी बिटकॉइन सारख्या डिजिटल करन्सीज् चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्यासाठी त्यातील जाणकार व्यक्ती नेहमीच मागणीत असतात. डिजिटल करन्सी ॲडवायजर लोकांना या नव्या वित्तप्रणालीमध्ये त्यांच्या संपत्तीचे व्यवस्थापन कसे करायचे ते शिकवतील. ॲडवायजरला वित्तिय व्यवस्थापन, अकाऊंटिंग, कंप्यूटर सुरक्षितता आणि ऑपरेटिंग सिस्टमची सखोल माहिती असावी. [3] 

ह्यूमन-टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन स्पेशालिस्ट

ह्यूमन-टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन स्पेशालिस्ट (मानवी-तंत्रज्ञान एकत्रिकरण तज्ञ) हा दैनंदिन वापरातल्या तंत्रज्ञानाविषयी सर्वसमावेशक दृष्टीकोन बाळगतो. कामाच्या ठिकाणी असो किंवा घरी असो, तंत्रज्ञान हे आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. म्हणूनच उत्पादकता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाला नीट समजून घेणे गरजेचे आहे. आंतरवैयक्तिक कौशल्ये आणि माहिती तंत्रज्ञानाची सखोल माहिती असेल तर तुमचे ग्राहक त्यांची विविध उपकरणे सहजतेने वापरू शकतील.

वर उल्लेखिलेल्या सर्व व्यवसायांमधील समान धागा म्हणजे तंत्रज्ञान. आजच्या मुलांना तंत्रज्ञानात पारंगत होऊन उद्याचे यशस्वी उत्पादक बनायचे आहे. त्यासाठी सुरूवात करायला योग्य पीसी ची निवड करा: http://www.dellaarambh.com/pick-right-school-pc/